
Mumbai: मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षांच्या तारखा विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पदवी स्तरावरील बीकॉम सत्र ६ची परीक्षा १८ मार्चला, बीएस्सी सत्र ६ची परीक्षा २६ मार्चला, बीए सत्र ६ची परीक्षा २६ मार्चला सुरू होणार आहे.
बीएस्सी आयटी सत्र ६ची परीक्षा २६ मार्चला, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्ग स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्चला, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ची परीक्षा २६ मार्चला घेण्याचे विद्यापीठामार्फत नियोजित करण्यात आले आहे.