esakal | मुंबई विद्यापीठाच्या BSC.IT सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर, 7002 विद्यार्थी उत्तीर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

BSCIT Result

मुंबई विद्यापीठाच्या BSC.IT सत्र ६ परीक्षेचा निकाल जाहीर, 7002 विद्यार्थी उत्तीर्ण

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) उन्हाळी सत्राच्या विज्ञान शाखेच्या (Science faculty) तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ (Third year BSCIT) या परीक्षेचा निकाल जाहीर (Result Announced) करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९६.५४ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Online Exam) घेण्यात आल्या होत्या. इतर पदवी परीक्षेच्या अंतिम सत्राच्या निकालाची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून तेही निकाल लवकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील (Dr vinod Patil) यांनी दिली. ( Mumbai University Third year BSCIT section six result declared)

या परीक्षेत एकूण ७००२ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ९ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ६११ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर १६ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २५१ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले असून विद्यापीठाकडून आतापर्यात उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ४१ निकाल जाहीर करण्यात आल्याची माहीतीही पाटील यांनी दिली.

loading image