मुंबईतील लसवंत किती? BMC सोडवणार लसीकरणाच्या आकडेवारीचा गुंता

vaccination
vaccinationSakal media
Updated on

मुंबई : मुंबई लवकरच 100 टक्के लसीकरण पूर्ण (corona vaccination) करण्याकडे सरसावते आहे. यातील बहुतांश मुंबईकरांनी किमान एक तरी डोस घेतला आहे. मात्र, पालिका यंत्रणेतील अधिकारी (bmc authorities) या लसीकरणावरुन गोंधळात असून लस घेतलेले नेमके मुंबईकर किती आणि मुंबईच्या बाहेरील किती? (vaccination report confusion) यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या गोंधळाच्या वातावरणावर पालिका अधिकारी वर्ग लसवंताच्या फेर पडताळणीच्या (रिकंन्सलीशन) कामाला लागले आहेत. यातून, मुंबईतील नेमके किती लसीकरण झाले आहे हे स्पष्ट होईल.

vaccination
मुंबईत 330 नव्या रुग्णांची भर, तर 5 रुग्ण दगावले

सध्या मुंबईत 99 टक्के नागरिकांचा पहिला आणि 61 टक्के नागरिकांचे पूर्ण लसीकरण झाले असल्याचे कोविन पोर्टलवरुन स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सध्या लसवंतांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सगळेच लाभार्थी हे मुंबईकर नाहीत तसेच नेमक्या किती लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आणि 84 दिवसांचा कालावधी उलटूनही दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांची यादी पालिकेने काढली आहे. कोविन पोर्टलवरुन ही माहिती पालिकेने काढली आहे.  पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार असे एकूण 3.84 हजार नागरिक आहेत ज्यांच्या दुसरा डोसचा कालावधी निघून गेला आहे.

दरम्यान, पालिका सध्या मुंबईकर नागरिकांचे किती लसीकरण झाले आहे? आणि किती नागरिकांनी कालावधी पुर्ण होऊनही दुसरा डोस का नाही घेतला हे शोधण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान, पुढच्या 10 दिवसांत लसीकरणाच्या आकडेवारीबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध होईल असे ही पालिकेकडून सांगण्यात आले आहे. पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार एकूण लसीकरणापैकी सरासरी 10 टक्के लसवंत मुंबईबाहेरील असल्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईबाहेरील ही टक्केवारी 10 टक्क्यांहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. 

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लस घेतलेल्यांमध्ये 10 टक्के नागरिक मुंबई बाहेरील असण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरातील मुलुंड किंवा पश्चिम उपनगरातील दहिसर लस केंद्रांवर अनुक्रमे ठाणे किंवा भाईंदर परिसरातून लस घेण्यास आले असल्यास त्यांना नकार देऊ शकत नाही, कारण आमचा मुख्य हेतू प्रत्येकाला लस मिळणे हा आहे.

vaccination
मुंबई : पश्चिम रेल्वेवरून किसान रेल्वेच्या 101 फेऱ्या पूर्ण

सध्या 24 वॉर्डातील किती मुंबईकरांनी लस घेतली याची माहिती काढण्याचे काम 24 वॉर्डातील वॉर रुमवर सोपवण्यात आले आहे. तसेच कोविड तीव्र असताना देखील पालिकांच्या कोविड केंद्रांमध्ये दाखल होणारे रुग्ण हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातीलच नव्हते तर ते मुंबई बाहेरील देखील होते. त्याप्रमाणेच लसवंतांची आकडेवारी देखील कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे, पालिका आता पहिल्यांदाच लसीकरणाच्या आकडेवारीबाबत फेर पडताळणी करुन यातला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

काही तज्ज्ञांच्या मते अनेक जण मुंबईत प्रवास करणारे असून हे उपनगरातील तसेच बाहेरील जिल्ह्यामधींल देखील आहेत. लसीकरण कार्यक्रम हा 16 जानेवारी रोजी सुरु झाला असून या कार्यक्रमातंर्गत लस देण्यावरच भर देण्यात आली होता.

लस न घेतलेल्या वस्त्या सोसायट्यांच्या शोधात पालिका :

यावर बोलताना काकाणी यांनी सांगितले की, लसीकरणाची केंद्र वाढवण्यात आली होती. पालिकेने 3 लाख नागरिकांचा डेटा 24 वॉर्डमधील वॉर रुममध्ये विभागून दिला आहे. प्रत्येक वॉर्डात 16 हजार लोकांची यादी देण्यात आली आहे. त्यांना संपर्क करण्यात येणार असून जर त्यांनी मुंबईबाहेर दुसरा डोस घेतला असेल तर त्यांचे नाव वगळण्यात येईल. जर मुंबईत पहिला डोस घेतला असून दुसरा डोस घेतला नाही अशांनाही लगेचच दुसरा डोस घेण्यास सुचित करण्यात येईल. तसंच, मुंबईतील अनेक नागरिकांनीही मुंबई बाहेर लस घेतलेली असू शकते या सर्वाचा शोध सुरू आहे असेही सुरेश काकाणी यांनी सांगितले. तसेच यातून एखाद्या वस्ती-सोसायटीने 100 टक्के लसीकरण करुन घेतले आहे किंवा एखाद्या वस्ती-सोसायटीने लसीकरण करुन घेतलेच नाही अशांची माहिती देखील यातून मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com