मुंबईत 60 लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण; संपूर्ण लसीकरणाचं आव्हान कायम | Mumbai vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत 60 लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण; संपूर्ण लसीकरणाचं आव्हान कायम

मुंबई : मुंबईसह (Mumbai) राज्यात सुरू असलेली कोविड लसीकरण मोहीम (corona vaccination drive) यशाची प्रत्येक शिडी ओलांडत आहे. गुरुवारी मुंबईत दोन्ही डोस घेणाऱ्यांची (two dose vaccination) संख्या 60 लाखांच्या पुढे गेली आहे. परंतु अजूनही 40 टक्के लोकसंख्येने दुसरा डोस घेणे बाकी आहे, ज्याचे आव्हान अजूनही पालिकेकडे (bmc) कायम आहे आहे.

हेही वाचा: ...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

बुधवार सायंकाळपर्यंत राज्यात 6 लाख 34 हजार 760 जणांचे लसीकरण करण्यात आले होते, त्यानंतर पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 7 कोटी 1 लाख 18 हजार 259 झाली आहे, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 3 कोटी 46 लाख 56 हजार 442 वर पोहोचली आहे. गुरुवारी मुंबईत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 60 लाखांवर गेली. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालावर नजर टाकली तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

लोक लसीकरणासाठी केंद्रांवर पोहोचत नाहीत. ही संथ गती वाढवणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ज्या भागात लसीकरणाची संख्या कमी आहे, तेथे गती वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top