esakal | मुंबईत आज फक्त तीनच तास होणार लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

मुंबईत आज फक्त तीनच तास होणार लसीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन

मुंबई: महापालिकेने पुन्हा एकदा फक्त तीन तास लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी 6 जुलैला लसीकरण मोहीम केवळ तीन तास राबवण्याचा निर्णय घेतला. पालिकेला लसींचा प्रचंड तुटवडा जाणवू लागल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, लसींच्या कमतरतेमुळे लाभार्थ्यांना एक दिवस आड करुन समस्येचा सामना करावा लागणार आहे. (Mumbai Vaccination Update doses will be given only for 3 hours today)

हेही वाचा: 'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की त्यांच्याकडे पुरेसा लस साठा नसल्याने केवळ तीन तास मोहीम राबवली जाईल. कोविड लसीचा साठा संपला आहे. तर, आज 6 जुलै रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेतच ही मोहीम सुरू राहणार आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा 95,000 डोस मुंबईत दाखल झाले आहेत, पण फक्त तीन तास लसीकरण सुरू राहील असेही काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: भाजपचे आमदार कोर्टात गेले तरी काही उपयोग नाही- छगन भुजबळ

याशिवाय, पालिकेकडे पुरेसा साठा नसल्याने नागरिकांना लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील 69,627 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यापैकी 18 ते 44 वयोगटातील 40,530 जणांना लस देण्यात आली. दरम्यान, लस संपली असल्याने अनेक लाभार्थ्यांना लस केंद्रांवर अडचणींना सामोरे जावे लागले. त्यापैकी बहुतेकांना लस न घेता परतावे लागले.

loading image