esakal | सार्वजनिक बांधकाम कल्याण उपविभागीय शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

सार्वजनिक बांधकाम कल्याण उपविभागीय शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण : मुंबई- वडोदरा द्रुतगती महामार्गाचे (Mumbai-vadodara highway) भुसंपादनात जात असल्याने त्या बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी (Report) सार्वजनिक बांधकाम (PWD) कल्याण उपविभागीय शाखा अभियंता अविनाश भानुशालीला (Avinash Bhanushali) एक लाख रुपये लाच घेताना (One lac Bribe) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Thane ACB) आज सोमवार ता 13 सप्टेंबर रोजी रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा: मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; 5 वॉर्ड्स हॉटस्पॉट

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादीचे मालकीच्या जमीनीवरील बांधकाम हे मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचे भुसंपादनात जात असल्याने सदर बांधकामांचे मुल्यमापन करुन अहवाल देण्यासाठी कल्याण सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालय मधील उपविभाग शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली याने 9 सप्टेंबर 2021 रोजी पडताळणी दरम्यान यापूर्वी 4 लाख स्विकारल्याचे मान्य करुन आणखी  एक लाख रकमेच्या लाचेची मागणी करुन त्याशिवाय अहवाल मिळणार नाही असे सांगितले. त्यावरुन आज सोमवार ता 13 सप्टेंबर रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कल्याण मधील सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण उपविभागीय कार्यालयमध्ये सुमारे एक लाख रुपयांची लाच घेताना शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे .

loading image
go to top