esakal | मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; 5 वॉर्ड्स हॉटस्पॉट
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये दुपटीने वाढ; 5 वॉर्ड्स हॉटस्पॉट

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येसह (Corona Active patients) सक्रिय रुग्णांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. एका महिन्यात सक्रिय रुग्णांनी 4 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, मुंबईतील 5 वॉर्ड्सअजूनही हॉटस्पॉट (Hotspot) आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना (Corona in Mumbai) रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. 15 ऑगस्टनंतर (Independence Day) मुंबईतील निर्बंध शिथील केल्यानंतर (unlock) गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत 500 च्या दरम्यान रुग्ण सापडत आहेत. रविवारी मुंबईत 354 रुग्ण सापडले. सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला असून तो पाच हजारांच्या घरात पोहोचला आहे.

हेही वाचा: उल्हासनगरात भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबईत एका महिन्यांपूर्वी 11 ऑगस्ट या दिवशी 289 कोरोना रुग्ण सापडले होते. तर, त्यावेळेस सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 2900 वर पोहोचली होती. पण, 15 ऑगस्ट ला निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा गर्दी वाढल्याने रुग्णांची संख्या 322 वर पोहोचली आणि सक्रिय रुग्ण 2853 होते. हीच संख्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस 3 हजारांवर पोहोचली आणि 3106 सक्रिय रुग्णांची नोंद झाली. हा आलेख वाढता राहिला असून 5 सप्टेंबरला रुग्णसंख्या 500 च्या घरात पोहोचली आणि सक्रिय रुग्णांची संख्या थेट 3,815 वर पोहोचली. 10 सप्टेंबरला रुग्णसंख्या कमी झाली पण सक्रिय रुग्णसंख्येत वाढ होऊन 4, 537 एवढी झाली. तर, 12 सप्टेंबरपर्यंत हा आकडा पाच हजाराच्या घरात पोहोचला असून 4,823 एवढे सक्रिय रुग्ण सध्या मुंबईत आहेत.

एका महिन्याचा आलेख

महिना रुग्ण   सक्रिय रुग्ण

11 ऑगस्ट -   289 2900

20 ऑगस्ट 322 2853

31 ऑगस्ट 323 3106

05 सप्टेंबर 496 3815

10 सप्टेंबर 441 4537

12 सप्टेंबर 354 4823

हेही वाचा: शिरवली गावात गणेशोत्सवात रंगते सारीपाटाची गंमत

19 सप्टेंबरपर्यंत रुग्ण वाढणार नाहीत

19 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव आहे. त्यामुळे, आता कोणीही जास्त चाचणी करण्यासाठी पुढे येणार नाही. कारण, जर चाचणी केली आणि पॉझिटिव्ह आली तर त्याचा त्रास कुटुंबाला होईल. या भीतीने कोणीही चाचणी करण्यासाठी येणार नाही. 19 सप्टेंबर नंतर किंवा पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर रुग्ण पुन्हा वाढतील. सध्या राज्यात सरासरी साडे तीन ते साडे 4 हजाराच्या दरम्यान रुग्ण आहेत. आणि मुंबईत 350 ते 500 च्या दरम्यान रुग्ण आहेत. ही परिस्थिती नियंत्रणात आहे. गेल्या चार आठवड्यांपासून रुग्णालयात 400 च्या घरात रुग्ण आहेत. त्यात वाढ झालेली नाही.

डॉ. बाळकृष्ण अडसूळ, अधिष्ठाता, सेव्हन हिल्स रुग्णालय

5 वॉर्ड्स हॉटस्पॉट

मुंबईतील रुग्णसंख्या जेव्हा कमी झाली होती तेव्हा ही मुंबईतील काही वॉर्ड्स हॉटस्पॉट ठरले होते. तशीच परिस्थिती अजूनही कायम असून मुंबईतील पाच वॉर्ड्स हे हॉटस्पॉट असून तिथे सक्रिय रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईतील के पश्चिम, ई, एफ दक्षिण, एच पश्चिम आणि एस या वॉर्डमध्ये इतर वॉर्ड्सपैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत.  

सर्वाधिक सक्रिय रुग्णांचे वॉर्ड

के पश्चिम 332

एच पश्चिम 284

एफ दक्षिण 272

एस 268

ई 256

loading image
go to top