esakal | मुंबईत भाजीपाला महागला; टोमॅटोचे भाव कडाडले | Vegetable
sakal

बोलून बातमी शोधा

Vegetables

मुंबईत भाजीपाला महागला; टोमॅटोचे भाव कडाडले

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : ऑक्टोबरच्या संततधार पावसाने (heavy rainfall) भाजीपाला खराब झाला. त्यामुळे बाजारपेठेत आवक कमी व वाढता वाहतूक खर्च पाहता दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी (vegetable price increases) करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. त्यात, सध्या टाॅमेटोचे भाव (tomato price) गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या बजेटवर परिणाम झाला असून ताटातल्या भाजीसह टाॅमेटोच्या वापरावर ही परिणाम झाला आहे.

हेही वाचा: भोसरी जमीन घोटाळा प्रकरण : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा दिलासा

अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून उत्पादित भाजीपाला कमी येत असल्याने बाहेर जिल्ह्यातून दररोज हजारो क्विंटटल भाजीपाला शहरात येतो. त्यात डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीचा खर्च पाहता भाजीपाला   50 ते 120 रुपये प्रतिकिलोने नागरिकांना खरेदी करावा लागल्याचे वास्तव आहे.

40 टक्के आवक घटली

"पावसामुळे टोमॅटोचं नुकसान झालं आहे, म्हणून भाव वाढले आहेत. टोमॅटोचं उत्पादन कमी झालेलं आहे.  त्यामुळे 30 ते 40% टक्क्यांनी आवक घटलेली आहे म्हणून भाव वधारले आहेत. 30, 40 ते 45 रुपये असा घाऊकचा भाव किलोमागे आहे. "

- शंकर पिंगळे, संचालक, भाजीपाला मार्केट, एपीएमसी वाशी

हेही वाचा: दादर फूल बाजारात झुंबड; दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी, कोरोनाचे भय हरवले

मुंबईतील अनेक किरकोळ बाजारात टाॅमेटोचे वेगवेगळे दर आहेत. सांताक्रूझ येथील बाजारात 80 रुपये किलो टॉमेटो विकला जात आहे तर अंधेरीच्या किरकोळ बाजारात 60 रुपये किंमतीचे टाॅमेटो विकले जात आहेत या आधी टाॅमेटोची किंमत 40 रुपये किलो होती आता मात्र प्रत्येक किलोमागे 20 ते 40 रुपये जास्तीचे द्यावे लागत आहेत.

किरकोळ बाजारातील किलोचे दर

भेंडी - 80  रुपये

भोपळा - 40 रुपये

शिमला मिरची- 60 रुपये

दुधी- 40 रुपये

मिरची- 40 रुपये

कोबी - 60 रुपये

वांगी- 60 रुपये

गवार - 80 रुपये

टोमॅटो - 60 रुपये

चवळी शेंग - 60 रुपये

पडवळ - 60 रुपये

फ्लाॅवर - 80 रुपये

फरसबी - 80 रुपये

वाटाणा - 120 रुपये

20 रुपयेही देणे परवडत नाही

"गणेशोत्सवानंतर घरी नवरात्रौत्सव साजरी केला जातो. मांसाहार बंद असतो. त्यामुळे, भाज्यांचे सेवन जास्त केले जाते. मात्र, हल्ली भाज्या फार महागल्या आहेत. पाव किलो भाजी आधी 7 ते 10 रुपये किलो होती पण आता 15 ते 25 रुपये पाव किलो भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच, भाजी वाढावयला  टोमॅटो घातले जातात पण ते ही महाग झाले आहेत. "

नम्रता दांडेकर, गृहिणी, वरळी

घाऊक बाजारातील किलोचे दर -

भेंडी - 42 रुपये

भोपळा - 25 रुपये

शिमला मिरची- 40 रुपये

दुधी- 25 रुपये

मिरची- 35 रुपये

कोबी - 12 रुपये

वांगी- 37 रुपये

गवार - 50 रुपये

टोमॅटो - 50 रुपये

चवळी शेंग - 35 रुपये

पडवळ - 25 रुपये

फ्लाॅवर - 25 रुपये

फरसबी - 35 रुपये

वाटाणा - 100 रुपये

loading image
go to top