मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! तुळशी धरणानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे 'हे' धरणही भरले

समीर सुर्वे
Thursday, 6 August 2020

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  या तलावानंतर विहार तलाव आता ओव्हरफ्लो झाला आहे.  विहार तलाव बुधवारी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे.

मुंबईः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  या तलावानंतर विहार तलाव आता ओव्हरफ्लो झाला आहे.  विहार तलाव बुधवारी रात्री 10 वाजल्याच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे आता मिठी नदीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजे 27 जुलैला तुळशी तलावातील पाणी ओव्हरफ्लो झाले होते.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांपैकी विहार हे तलाव आहे.  दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा तलाव बुधवारी रात्री 10 च्या सुमारास ओसांडून वाहू लागले. तलावात 27 हजार 698 दशलक्ष लिटर पाणी जमा आहे. या तलावातून दिवसाला 90 दक्षलक्ष पाण्याचा पुरवठा होतो. 1859 मध्ये हा तलाव बांधण्यात आला होता. पूर्ण भरलेला असताना या तलावाचे क्षेत्र 7.26 चौरस किलो मिटर आहे.

या तलावाच्या सांडव्याचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे हा तलाव भरु लागल्यावर मिठी नदीत पाण्याची पातळी वाढलेली असते. त्यामुळे इता मिठी नदीचा धोका वाढला आहे.

अधिक वाचाः धक्कादायक ! निकृष्ट मास्क वापरल्यास कर्करोगाचा धोका, तुमचा मास्क सुरक्षित आहे का?

बोरिवली नॅशनल पार्कच्या हद्दीत असलेला विहार तलाव भरला आहे. यामुळे मुंबईकरांवरचे पाणी संकट टळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी एक विहार तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याआधी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तुळशी तलाव भरला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान 2 तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 90 दशलक्ष लीटर (9 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

हेही वाचाः चाकरमान्यांनो गावी जाताय ? गावी जाताना शिदोरी सोबतच ठेवा, नाहीतर... 

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार,पाणीपुरवठा करणाऱ्या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा विहार तलाव दिनांक 05 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 27,698 दशलक्ष लीटर पाण्याची क्षमता असणारा हा तलाव गेल्यावर्षी दिनांक 31 जुलै, 2019 ला ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष 2018 मध्ये दिनांक 16 जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

(संपादनः पूजा विचारे)

mumbai vihar lake overflows due heavy rainfall


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai vihar lake overflows due heavy rainfall