esakal | धक्कादायक ! निकृष्ट मास्क वापरल्यास कर्करोगाचा धोका, तुमचा मास्क सुरक्षित आहे का?
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! निकृष्ट मास्क वापरल्यास कर्करोगाचा धोका, तुमचा मास्क सुरक्षित आहे का?

मास्क बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कापड आणि तंत्रज्ञान गुणवत्तापुर्वक नसेल तर त्यापासून कर्करोगाचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

धक्कादायक ! निकृष्ट मास्क वापरल्यास कर्करोगाचा धोका, तुमचा मास्क सुरक्षित आहे का?

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना महामारीमुळे मास्कचे उत्पादक, पीपीई किट्स, सॅनिटायझिंग आणि डिसइन्फेक्टिंग सोल्यूशन्स अशा काही उत्पादनांना प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. ही उत्तम संधी असली तरी त्यातून हेल्थ अँण्ड हायजिन क्षेत्रातील काही कंपन्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा, अर्थात 'रॅट रेस' सुरू झाली. मात्र मास्क बनवण्यासाठी वापरण्यात येणारे कापड आणि तंत्रज्ञान गुणवत्तापुर्वक नसेल तर त्यापासून कर्करोगाचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. 

मास्कसाठी निकृष्ट दर्जाच्या साधनांना वापर केल्यास कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो असे लिव्हिंंगार्ड टेक्नॉलॉजीचे सीईओ आणि संशोधक संजीव स्वामी यांनी सांगितले. काही उत्पादनांमध्ये 10-20 टक्के बेन्झाल्कोनिअम क्लोराईड म्हणजे बीएसी असू शकते. वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार बीएसीमधील घटकांमुळे श्वसनप्रक्रियेला हानीकारक ठरणारे विषारी घटक असतात असे ही ते पुढे म्हणाले. बीएसीच्या संपर्कात आल्यास मानवाच्या श्वासनलिकेशी संबंधिप पेशींमध्ये डीएनएला हानी पोहोचते आणि तिथे कर्करोगाला पुरक स्थिती तयार होते. तसेच बीएससी सतत किंवा अधिक प्रमाणात श्वासात आल्यास फुफ्फुसांना त्रास होतो, जळजळ वाढते आणि अल्व्होलर (फुफ्फुसांमधील एक भाग) चे नुकसान होते अशी माहिती ही स्वामी यांनी दिली. 

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

काही ब्रँड्स आपल्या उत्पादनात टिटॅनिअम डायऑक्साईड आणि सिल्व्हर क्लोराईडच्या रिऍक्शन मासचा वापर करतात. कोरोनाचा खात्मा करणारे मास्क असे चुकीचे दावेही सर्रासपणे केले जात आहेत. कॅनॅडियन सेंटर फॉर अक्युपेशनल हेल्थ अँण्ड सेफ्टी (सीसीओएचएस) ने नमूद केल्यानुसार टिटॅनिअम डायऑक्साईड श्वासावाटे मानवी शरीरात गेल्यास फुफ्फुसांच्या कर्करोगास पुरक असे घटक त्यात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार सुरक्षा उपकरणे पुरवणे फार महत्वाचे असल्याचे ही संजीव स्वामी म्हणाले.

मास्क बनवण्यासाठी जर का घातक रसायने, चांदी, टिटॅनियम, झिंक किंवा इतर रसायनांचे अधिक प्रमाण आणि धातूचा अधिक वापर केल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते. इतकेच नाही तर मास्कमध्ये अँटिव्हायरल वैशिष्ट्ये किंवा तत्सम घटक असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही चाचण्या कंपनीने केलेल्या नसतात आणि त्याचे पुरावेही नसतात. अशा प्रकारची रसायने जितकी जास्त प्रमाणात फुफ्फुसात जातात तेवढा मृत्यूचा धोका वाढतो असा इशाराही स्वामी यांनी दिला आहे.

BIG NEWS : शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, रुग्णाच्या मेंदूच्या कवटीच्या हाडाचा तुकडा काढला आणि...

एन 95 मास्क कोविड संरक्षणासाठी बनवला गेलेला नाही. जागतिक आरोग्य परिषदेने आरोग्य कर्मचाऱ्यांना असे एन95 वापरण्यास सांगितले आहे. ज्यात 300 नॅनोमीटर किंवा मोठे घटक अडवले जाण्याची क्षमता आहे. असे परिणामकारक मास्क जे विषाणू मारू शकतील, त्यांना निष्क्रिय करू शकतील आणि ते संपूर्णपणे जैविक विघटनशील असतील, संपूर्ण सुरक्षेची खात्री देत कोणत्याही प्रकारचा कचरा तयार करणार नाहीत अशा प्रकारचे मास्क ही काळाची गरज असल्याचे ही ते पुढे म्हणाले.

मास्क निवडण्यापूर्वी ही माहिती नक्की घ्या : 

  • मास्क प्रमाणित किंवा संबंधित नियामक मापदंडानुसार तयार करण्यात आला आहे का? 
  • कोरोना टेस्टिंग लॅबचे प्रोटोकॉल विश्वासार्ह आहेत का? कापड उत्पादनातील अँटिव्हायरल वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी ISO 18184 हे आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. 
  • त्यातील अँटिव्हायरल वैशिष्ट्यांचा कालावधी किती? ISO 18184 प्रोटोकॉलनुसार टेस्टिंगच्या आधी मास्क 10 वेळा धुतलेला आहे का? 
  • वापरण्यात आलेले अँटिव्हायरल एजंट्स किती सुरक्षित आहेत ?
  • या उत्पादनाने जैविक अनुकूलता चाचणी पास केली आहे का आणि सुरक्षा डेटा आहे का? 

( संकलन - सुमित बागुल )

using inferior quality mask may lead you to lungs cancer says experts

loading image