esakal | BMC च्या वॉर रुम्समध्ये २१ दिवसात ७४ हजारपेक्षा जास्त फोन कॉल्स

बोलून बातमी शोधा

Corona Test

या फोन कॉल्सने मुंबईत कोरोनामुळे काय स्थितीय त्याची कल्पना येते.

BMC च्या वॉर रुम्समध्ये २१ दिवसात ७४ हजारपेक्षा जास्त फोन कॉल्स

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: एप्रिल महिन्याच्या पहिल्या २१ दिवसात महापालिकेच्या २४ वॉर्डातील वॉर रुम्समध्ये एकूण ७४ हजार ३१७ फोन कॉल्स आले. कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल बेड्स, रुग्णवाहिका आणि क्वारंटाइन संदर्भातील माहितीची विचारणा करण्यासाठी हे फोन कॉल्स केले होते. मागच्यावर्षी मे महिन्यात १ लाख फोन कॉल्स आले होते. मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात फोन कॉल्सचे प्रमाण १५० टक्के जास्त होते. मार्च महिन्यात वॉर रुम्समध्ये ३० हजार ९६ फोन कॉल्स आले.

वॉर रुम्समध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णाला फोन कॉल करावा लागतो. सध्या दररोज ५ हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडतायत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या महिन्यात फोन कॉल्स वाढतील याची कर्मचाऱ्यांना कल्पना होती. डिसेंबर २०२० आणि जानेवारी महिन्यात कॉल्सचे प्रमाण कमी झाले होते. त्यावेळी वॉर रुम्समधील मनुष्यबळ कमी करण्यात आले होते.

हेही वाचा: 'या लढ्यात मी भारतीयांसोबत'; कोरोना संकटात इम्रान खान यांनी भारतासाठी केली प्रार्थना

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यानंतर शिक्षक, डॉक्टर्स आणि महापालिका कर्मचारी पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. वॉर रुममध्ये फोन कॉल घेणे इतके सोपे नसते. त्या कर्मचाऱ्याला रुग्णाची प्रकृती किती गंभीर आहे, हे समजून घ्यावे लागते.

हेही वाचा: महाराष्ट्रात ६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर

आमच्या डॉक्टरांना पेशंटबद्दल सविस्तर माहिती घ्यावी लागते, त्यानंतर सल्ला द्यावा लागतो. ICU बेडबद्दल विचारणा करणाऱ्या सर्वच रुग्णांना त्याची गरज नसते. गोंधळलेले नातेवाईक काही वेळा आमच्याशी वादही घालतात. त्यावेळी त्यांना समजवावे लागते, असे अधिकाऱ्याने सांगितले.