
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधाकारक पडत असल्याने तलावांतील जलसाठ्यात ३,६४,२३३ दशलक्ष लिटर म्हणजे २५.१७ टक्के इतकी वाढ झाली आहे. हा साठा पुढील १८ सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.