esakal | मुंबईत पाणीसाठा 90 टक्क्यांहून अधिक; जोरदार पावसाची प्रतिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai Lake

मुंबईत पाणीसाठा 90 टक्क्यांहून अधिक; जोरदार पावसाची प्रतीक्षा

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : शहराला पाणी पुरवठा (water supply) करणाऱ्या तलावांमध्ये (lake) 90 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (water level) जमा झाला आहे. तर,पुढील 27 दिवसात 1 लाख 33 हजार दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणीसाठा (extra water need) जमा होण्याची गरज आहे. त्यासाठी मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.

हेही वाचा: उल्हासनगरच्या वृद्ध महिलेच्या घरात लाखोंचा खजाना; ऐवज पोलिसांच्या ताब्यात

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलांमध्ये आजच्या दिवसा पर्यंत 13 लाख 14 हजार 113 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीसाठ्यानुसार वर्षभराचे नियोजन केले जाते.वर्षभर सुरळीत पाणी साठा होण्यासाठी तलावांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठा गरजेचा असतो.त्यामुळे आता पुढील 27 दिवसात हा साठा 1 लाख 33 हजार दशलक्ष लिटरने वाढण्याची गरज आहे. जुलै महिन्यात पाऊस दणकून झाल्यानंतर ऑगस्टचा निम्म्या पेक्षा जास्त महिना कोरडाच गेला होता.आता गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तलाव क्षेत्रात पाऊसचा जोर वाढला आहे.या महिन्यात पावसाचा जोर चांगला राहाण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

तीन वर्षातील कमी साठा

गेल्या तीन वर्षातील हा कमी पाणीसाठा आहे.मात्र,गेल्या वर्षी सुरवातीच्या दिवसात पावसाने ओढ दिल्याने पाणी कपात लागू करण्यात आली होती.यंदाही सुरवातीच्या दिवसात तशी परीस्थीती निर्माण झाली होती.मात्र,जुलै महिन्यात तुफान झालेल्या पावसाने बॅकलॉग भरुन काढला असला तरी या तीन वर्षातील सर्वात कमी पाणी साठा सध्या जमा आहे.2019 मध्ये 14 लाख 18 हजार 756 दशलक्ष लिटर आणि 2020 मध्ये 14 लाख 6 हजार 987 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.

तलावातील पाणीसाठा (दक्षलक्ष लिटर) आणि तलाव पातळी (मिटर)

तलाव -पुर्ण भरल्यानंतर-आजची पाणी पातळी-पाणीसाठा

-अप्पर वैतरणा-603.51--602.08-180956

-मोडकसागर-163.15-161.59-116356

-तानसा -128.63-128.54-143475

-मध्य वैतरणा-285.00-283.12-182834

-भातसा-142.07-139.79-654747

-विहार-80.12--80.31-27698

-तुलसी-139.17-139.22-8046

तलावातील पाऊस -

-अप्पर वैतरणा-8

-मोडकसागर-16

-तानसा -2

-मध्य वैतरणा १

-भातसा -2

-विहार - 8

-तुलसी -19

loading image
go to top