Mumbai Water News: पनवेलमध्ये भीषण पाणी टंचाई ; ३ दिवस परिसरात पाणीबाणी

mumbai water supply
mumbai water supply sakal
Updated on

Mumbai Water News: शहरातील ओनजीसी काॅलनीच्या समोर जुना मुंबई-पुणे मार्गालगत असलेली जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम एमजीपीकडून केले जाणार आहे. यासाठी बारा तासाचा शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, काळुंद्रे, करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे,उसली, बेलवली, बारदोली,नांदगाव, कुडावे या वसाहतींसह गावांमध्ये पुढील तीन दिवस पाणींटचाईच्या संकटाचे असणार आहेत.

पनवेल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने

एमजीपीकडून जलवाहिनी दुरुस्तीची कामे घेतली जात आहे. जुना मुंबई-पुणे मार्गावरील ओनजीसी काॅलनीच्या समोर अनेक दिवसांपासून गळती होत असल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी (ता.३०) बारा तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पुढील तीन दिवस पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमजीपीने केले आहे.

mumbai water supply
Mumbai Crime: महिलेच्या घरातुन दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त!

पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाई

पनवेल आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी एमजीपीची जलवाहिनी जीर्ण झाली आहे. वारंवार जलवाहिनी फुटीमुळे संबंधित विभाग हतबल झाला आहे. त्यामुळे एेन पावसाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याबद्दल पनवेलकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पनवेलसह वसाहतींना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून बदलण्याचे काम सुरू आहे. परंतु, हे काम सुरू असतानाच जलवाहिनीला गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. तसेच शटडाऊन कालावधीच्या जास्तीत जास्त पाणी साठवून ठेवावे. जेणेकरून या कालावधीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची धावपळ होणार नाही.

- के. बी.पाटील, उप-विभागीय अभियंता, एमजीपी

mumbai water supply
Mumbai Sextortion: मुंबईत वाढले सेक्सटॉर्शनचे प्रकार; पोलीसांपुढे मोठे आव्हान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com