Mumbai Sextortion: मुंबईत वाढले सेक्सटॉर्शनचे प्रकार; पोलीसांपुढे मोठे आव्हान!

Types of sextortion on the rise in Mumbai; Big challenge before the police!
Sextortion
SextortionEsakal
Updated on

Mumbai Sextortion: शहर परिसरात सायबर गुन्हेगारीप्रमाणेच सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यांचे मोठे आव्‍हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. आरोपी हे राज्याबाहेरील असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत मुंबईत सेक्स्टॉर्शनच्या ४६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील केवळ नऊ प्रकरणांचीच उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. फसवणुकीला बळी न पडता नागरिकांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता असल्याचे आवाहन सायबर गुन्हे तज्ज्ञांनी केले आहे.

Sextortion
Mumbai Health: मुंबईतील वातावरणामुळे आजारांमध्‍ये वाढ !

मुंबईत काही वर्षांपासून सेक्स्टॉर्शनच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. मागील काही वर्षांतील या गुन्ह्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. मुंबईत २०१२ मध्ये सेक्स्टॉर्शनचे ५४ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ३० गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी ५२ आरोपींना अटक करण्यात यश मिळवले होते; तर वर्ष २०२२ मध्ये ७८ गुन्ह्यांपैकी केवळ २५ गुन्ह्यांचीच उकल झाली होती. २०२२ मध्ये सायबर गुन्हे प्रकरणांत ३४ आरोपींना गजाआड करण्यात आले होते. २०२२ मध्ये दाखल झालेल्या सेक्स्टॉर्शनच्या २० गुन्ह्यांत १० लाखांहून अधिक रकमेची खंडणी उकळण्यात आली होती.

गुन्हेगार आपले सावज हेरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करतात. सोशल मीडियावर अनेकदा मैत्रीसाठी वारंवार विनंती केली जाते. तरुण आणि किशोरवयीन मुले त्यांचे लक्ष्य असतात; मात्र दोन वर्षांत मध्यमवयीन व्‍यक्तींचीही संख्या वाढली आहे. अनेक जण समाजात बदनामी होईल या भीतीने तक्रार करत नाहीत. अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. कोण किती खंडणी देऊ शकेल, याचा विचार करूनच आपल्या सावजावर जाळे टाकत असल्याचे अनेक प्रकरणांच्या पोलिस तपासातून उघड झाले आहे.

Sextortion
Mumbai Crime News : महिलेचा तीन तुकडे केलेला मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

सेक्स्टॉर्शन म्हणजे काय?

सेक्स्टॉर्शन हा सायबर गुन्ह्याचाच प्रकार आहे. इंटरनेटच्या जगात विविध सोशल मीडिया मंचावरून अनोळखी व्‍यक्तीशी सहज ‘चॅटिंग’ करता येते. त्याचाच फायदा घेत सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यात वापर करत आहेत. हे गुन्हेगार सहज एखाद्या अनोळखी व्‍यक्तीशी सतत संभाषण सुरू करून ओळख वाढवतात.

मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण करतात. ऑनलाईन मैत्रीचे पुढे नात्यात रूपांतर करून त्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्यास सुरुवात करतात. त्यातूनच पुढे अश्‍लील संभाषण आणि चित्रफितींची देवाणघेवाण केली जाते. काही वेळा रेकॉर्ड झालेल्या प्रतिमा मॉर्फ केल्या जातात. त्यानंतर खंडणीसाठी कॉल येतात. तुम्ही ठरलेली खंडणी दिली नाही तर तुमच्या अश्लील, नग्न प्रतिमा, चित्रफिती प्रसारमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली जाते.

गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी

अनेकदा वयाने लहान किंवा विरुद्ध लिंगी असल्याचे आरोपीकडून भासवले जाते. पीडितांनी फोटो पाठवण्यास नकार दिल्यास आत्महत्येची धमकी, पीडितांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सार्वजनिक सोशल मीडिया प्रोफाईलला भेट देणे, ज्यात पीडितांच्या फ्रेंड लिस्टमध्ये प्रवेश करणे आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारी इतर वैयक्तिक माहिती शोधणे आदी बाबी केल्या जातात.

स्वत:चा बचाव कसा कराल?

- अपरिचित व्‍यक्तीची ऑनलाईन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका.

- अनोळखी व्यक्तीबरोबर ई-मेल किंवा सोशल मीडिया हँडल्स शेअर करू नका.

- वैयक्तिक माहिती विचारली तर सांगू नका.

- तुमचा पासवर्ड शेअर करू नका. पाळीव प्राण्यांची नावे, जन्मतारीख इत्यादी अंदाज लावण्याइतके सोपे पासवर्ड वापरू नका.

- अनोळखी ई-मेलमधील लिंकवर क्लिक करू नका

Sextortion
Mumbai Local Crime: धक्कादायक: धावत्या लोकलमध्ये झाला महिलेचा विनयभंग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com