

Mumbai Dam Water Levels Rise After Heavy Rain
esakal
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ९.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून त्यात सुमारे ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत साठा अद्याप समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत किती पाऊस पडतो, यावरच मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.