लसीकरण करूनही झालेला संसर्ग दिशादर्शक ठरणार; BMC कडून प्रकरणांचा अभ्यास | vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-patient

लसीकरण करूनही झालेला संसर्ग दिशादर्शक ठरणार; BMC कडून प्रकरणांचा अभ्यास

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : लसीकरणाला (vaccination) दहा महिने उलटले आहेत. 16 जानेवारी 2021 पासून मुंबईत लसीकरण सुरु झाले आहे. मात्र, दोन्ही किंवा एक डोस घेतलेल्या नागरिकांना पुन्हा संसर्ग होत (vaccinated patient corona) असल्याचे समोर येत आहे. दोन्ही डोस घेऊन कोरोना संसर्ग (corona infection) झाल्यास त्याला ब्रेक थ्रू म्हणतात, असे ब्रेक थ्रू संसर्ग (break through infection) झालेले रूग्ण 32 हजार 898 जण असून मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येसमोर मामुली आहे. शिवाय लसीकरणामुळे कोविड बाधेच्या तीव्रतेत गंभीरता कमी आहे. दोन्ही लस घेतल्यानंतर ही ब्रेक थ्रू झाल्यास ही प्रकरणे पालिकेकडून (Bmc) अभ्यासली जात असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: डोंबिवली : वृद्धाने केला 9 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग; आरोपी गजाआड

मुंबईत पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांमध्ये 1 फेब्रुवारी ते 7 नोव्हेंबर दरम्यान कोविड-19 च्या पुन्हा संसर्गाचे प्रमाण  1% पेक्षा कमी आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 1 फेब्रुवारी ते 7 नोव्हेंबर 2021 दरम्यान पूर्ण किंवा अंशतः लसीकरण झालेल्यांपैकी एक टक्‍क्‍यांहून कमी लोकांना कोविडची लागण झाली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू झाल्यापासून 10 महिन्यांत 32,898 लोकांना संसर्ग झाला. पालिकेच्या अहवालानुसार, त्यांच्यात संसर्गाची तीव्रता तुलनेने कमी आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, 35,24,653 लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस मिळाला, त्यापैकी फक्त 16,933 नागरिकांना म्हणजेच 0.48 टक्के संसर्ग झाला. त्याचप्रमाणे, 53,83,945 लोकांपैकी 15,965 म्हणजेच 0.20 टक्के - ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे, हे प्रमाण 1 टक्क्यांपेक्षाही खाली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुसंख्य लोकसंख्येमध्ये गंभीर संसर्ग रोखण्यासाठी लस प्रभावी आहे. रूग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची गणना केल्यावर संख्या वाढू शकते. पण, हा डेटा संकलित केला जात आहे.

हेही वाचा: 'नेत्यासोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

संपूर्ण जगात ब्रेकथ्रू संसर्गाची नोंद झाली आहे आणि सुरुवातीला ही चिंतेची बाब होती, मात्र, लसीकरण न केलेल्या लोकांच्या तुलनेत या संसर्गाचे प्रमाण सौम्य आहे असे डॉक्टरांच्या लक्षात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, राज्यभरात किंवा राष्ट्रीय स्तरावर आढळून आलेल्या ब्रेक थ्रू संसर्गाची तुलना करणे कठीण आहे कारण अशी संख्या सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध नाही. ब्रेकथ्रू संसर्गामध्ये मृत्यू दर आणि कोविड नंतरची गुंतागुंत कमी आहे. कोणतीही लस 100 टक्के सुरक्षितता  देऊ शकत नाही.

संसर्गजन्य रोग तज्ञ आणि कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ ओम श्रीवास्तव म्हणाले की, लस घेतल्यानंतर काही लोकांना पुन्हा संसर्ग झाल्याची शक्यता आहे, तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. “ लस प्रभावी आहे की नाही हे सांगणे खूप लवकर आहे. यासाठी किमान एक ते तीन वर्षे लक्ष द्यावे लागेल आणि पाठपुरावा करावा लागेल. परंतु, जेव्हा लसीकरणाची वेळ येईल तेव्हा लस घ्यावी लागले. त्याच वेळी कोविड प्रोटोकॉलचे पालन केले पाहिजे. जेव्हा वेळ येईल तेव्हा बूस्टर डोस देखील घ्यावा,”

loading image
go to top