Mumbai Watertaxi Ticket : वॉटरटॅक्सीचे तिकीट स्वस्त; १०० ते १५० रुपयांनी दरकपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Watertaxi Ticket Price reduction by Rs100 to Rs150 seafaring

Mumbai Watertaxi Ticket : वॉटरटॅक्सीचे तिकीट स्वस्त; १०० ते १५० रुपयांनी दरकपात

मुंबई : मुंबई ते मांडवादरम्यान चालणाऱ्या वातानुकूलित हायस्पीड वॉटरटॅक्सीकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्यानंतर आता तिकीटदरात १०० ते १५० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य पर्यटकांनाही या टॅक्सीतून समुद्रसफारीचा आनंद लुटता येणार आहे.

गत १ नोव्हेंबर २०२२ पासून मुंबईकरांच्या सेवेत भारतीय बनावटीची अत्याधुनिक वातानुकूलित हायस्पीड वॉटरटॅक्सी सुरू झाली. मुंबईचे डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनस ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सीच्या दररोज तीन फेऱ्या होतात; परंतु वॉटरटॅक्सीचे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. वॉटर टॅक्सीच्या तिकीटदरात कपात केली आहे.

सुधारित तिकीटदर

‘नयन इलेव्हन’ या वॉटर टॅक्सीसाठी पूर्वी खालच्या डेकसाठी प्रतिव्यक्ती ४०० रुपये, तर वरच्या डेकसाठी प्रतिव्यक्ती ४५० रुपये भाडे होते. त्यात आता अनुक्रमे १५० रुपये आणि १०० रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे खालच्या डेकचे तिकीट आता २५०, तर वरच्या डेकची तिकीट ३५० रुपये आली आहे.

वेळापत्रक

मुंबई क्रूझ टर्मिनलवरून : सकाळी १०.३० वा., दुपारी १२.५० वा., दुपारी ३.१० वा.

मांडवा येथून : दुपारी ११.४० वाजता, दुपारी २.०० वाजता आणि दुपारी ४.२० वाजता