esakal | Mumbai Cold Weather: माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Cold Weather: माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली

मुंबईतील पारा कमालीचा खाली गेल्याने गारठा वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली गेला आहे.

Mumbai Cold Weather: माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईतील पारा कमालीचा खाली गेल्याने गारठा वाढला आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानपेक्षा मुंबईतील पारा खाली गेला आहे.

माथेरान हे राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. आज तेथे 17.2 इतके नोंदवले गेले.  मात्र मुंबईचा पारा माथेरानच्या ही खाली गेला असून मुंबईतील किमान तापमान 16 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील सांताक्रूझ येथे आज किमान तापमान 16 अंश सेल्सियस तर कुलाबा येथे 18.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील उष्माकमी झाला असून गारठा वाढला आहे. मंजुळ थंड वारे देखील वाहत आहेत.

हेही वाचा- Republic Day 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

उत्तर भारतात शीत वारे वाहणे सुरू आहे. परिणामी उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडी चा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबईसह ठाणे, कोकण पट्ट्यात ही थंडी वाढल्याचे दिसते. पुढील दोन दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai weather update republic day cold temperature more Than Matheran

loading image