
बेकायदा होर्डिंगवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिका प्रशासनाची खरडपट्टी काढली. फोर्ट परिसरात होर्डिंग लावू नये, असे निर्देश असतानाही होर्डिंग का लावले गेले, आदेशांचे पालन का केले नाही, तुमचे अधिकारी बहिरे आहेत का, आयुक्त काय करत आहेत, असा प्रश्नांचा भडीमार मुख्य न्यायमूर्तींनी केला. याप्रकरणी पुढील सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले.