Mumbai :मुंबई, ठाण्यातील महाविद्यालयांत अर्ज भरण्यास सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yin

‘यिन’चा मुख्यमंत्री कोण होणार?

मुंबई : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क (यिन)च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुंबईसह ठाण्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीतून ‘यिन’चा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र यिनचे प्रमुख श्याम माडेवार व मुंबई यिनचे प्रमुख संदीप पालवे हे विविध महाविद्यालयांत दौऱ्यावर असताना त्यांनी विद्यार्थ्यांशी भेटीगाठी घेतल्या. यिनची संपूर्ण निवडणूक म्हणजे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते मतदान ही संपूर्ण प्रक्रिया यिन ॲपद्वारे पार पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये मुलांसोबतच मुलींचा सहभागही वाढला आहे. अजूनही आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यिन निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला नसेल तर त्वरित ९०८२१५४०६० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यिनचा नेतृत्व विकास कार्यक्रम हा नक्कीच विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीसाठी एक मोलाचे पाऊल ठरेल. विद्यार्थी दोन लशीचे डोस पूर्ण करून महाविद्यालयात येत आहेत. पुन्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमाच्या दृष्टीने उत्साहाचे वातावरण आहे.

- डॉ. किरण माणगावकर, प्राचार्य, गुरुनानक खालसा कॉलेज.

हेही वाचा: मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपले

आमच्या विद्यार्थिनींनीही वेळोवेळी ‘यिन’च्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. प्रामुख्याने आमच्या महाविद्यालयात गरीब घरातील मुलींचे प्रमाण हे जास्त आहे. आम्ही विद्यार्थिनींसाठी या वर्षी नवे असे उपक्रम सुरू करत आहोत. ‘यिन’च्या निवडणुकीमध्ये आमच्या विद्यार्थिनी अर्ज दाखल करत आहेत.

- डॉ. लीना राजे, प्राचार्य, मनीबेन एम पी शाह वूमेन्स कॉलेज, माटुंगा

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करणे : ११ ते २२ नोव्हेंबर २०२१

उमेदवार यादी जाहीर करणे : २३ नोव्हेंबर २०२१

ऑनलाईन प्रचार कालावधी : २३ ते २८ नोव्हेंबर २०२१

मतदानाची तारीख : ३० नोव्हेंबर २०२१

निवडणुकीचा निकाल : २ डिसेंबर २०२१

निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ‘यिन’च्या ॲपद्वारे पार पडणार आहे. नागरिक शिक्षण संस्था या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना यिन ॲप व मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी प्राध्यापिका डॉ. सुमिता शंकर व प्रभारी प्राचार्य डॉ. शमीम सय्यद उपस्थित होते.

loading image
go to top