
'या' महिन्यात मुंबई सुरक्षित असेल आणि शाळाही येतील उघडता
मुंबई: मुंबई शहरातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे कारण शोधण्यासाठी गणितीय मॉडेल मांडण्यात आले आहे. या मॉडेलनुसार मे च्या पहिल्या आठवड्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असेल. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर सध्या जास्त आहे. पण एक जूनपर्यंत जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होते तितके, मृत्यूदराचे प्रमाण खाली येईल, असा अंदाज या मॉडेलने वर्तवला आहे. TIFR च्या वैज्ञानिकांनी हे गणितीय मॉडेल मांडले आहे. (Mumbai will be safer by June 1 if no hitch in vaccination)
कुठल्याही अडथळ्याशिवाय मुंबईत लसीकरण सुरु राहिले आणि नव्या स्ट्रेनचा धोका नसेल, तर मुंबई १ जुलै किंवा त्यानंतर शाळा उघडण्याच्या स्थितीमध्ये असेल. दुसऱ्या लाटेचा २.३ लाख मुंबईकरांना फटका बसला असून एप्रिल महिन्यात १,४७९ मृत्यू झाले आहेत.
हेही वाचा: म्हणून मोदी लॉकडाउन टाळतायत, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचा दावा
एक मे रोजी ९० मृत्यूंची नोंद झाली. या वर्षात मुंबईत कोरोनामुळे एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत. मागच्यावर्षी २४ जून २०२० रोजी मुंबईत कोरोनामुळे एकाच दिवसात सर्वाधिक १२० मृत्यू झाले होते. (Mumbai will be safer by June 1 if no hitch in vaccination)
हेही वाचा: धक्कादायक! बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, मुलुंडमधील घटना
SARS-CoV-2 विषाणूच्या नव्या प्रकारामुळे ही दुसरी लाट आल्याचे तसेच लोकल ट्रेन सेवेमुळे हा विषाणू पसरल्याचे संकेत TIFR च्या गणितीय मॉडेलमधुन देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुंबई शहर बऱ्यापैकी खुले झाले होते आणि लोकल ट्रेनही सामान्यपणे धावत होत्या. त्यावेळी मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य मोठ्या जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा फैलाव सुरु होता. रस्ते आणि रेल्वेमध्ये बऱ्यापैकी गर्दी वाढली होती. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला फैलावासाठी हे पोषक वातावरण होते. त्यातून दुसरी लाट आली, असे TIFR च्या गणितीय मॉडेलमध्ये म्हटले आहे.
Web Title: Mumbai Will Be Safer By June 1 If No Hitch In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..