esakal | अल्पवयीन आईने जन्मानंतर बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, मुलुंडमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, मुलुंडमधील घटना

घरातल्या बाथरुममध्ये तिची प्रसुती झाली.

धक्कादायक! बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, मुलुंडमधील घटना

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या मुलुंड भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने प्रसुती झाल्यानंतर आपल्याच बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकून दिलं. पोलिसांनी या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांवर हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून ती तिच्या कुटुंबासमवेत मुलुंड भागामध्ये राहते. एक अल्पवयीन मुलासोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांमध्ये शारिरीक संबंध निर्माण झाले. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली.

सातव्या महिन्यात गरोदर असताना बाथरुममध्ये तिची प्रसुती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यास आपली प्रचंड बदनामी होईल म्हणून तिने या नवजात मुलाला दुसर्‍या मजल्यावरुन फेंकून दिले होते. २१ एप्रिल रोजी ही घटना घडली.

हेही वाचा: अदर पुनावाला धमकी प्रकरण, शेलारांचा सूचक इशारा

बाळाचा जागेवरच मृत्यू झाला. हा प्रकार मुलुंड पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुठलाही पुरावा नसताना मुलुंड पोलिसांनी संबधित मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले, चौकशीत तिने घडलेला प्रकार सांगून नवजात मुलाला तिनेच राहत्या घरातील दुसर्‍या मजल्यावरुन फेंकून दिल्याची कबुली दिली.

हेही वाचा: भंगारावरून राडा... शिवसेना आमदाराच्या मुलाच्या गाडीची तोडफोड

त्यानंतर तिला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत ताब्यात घेतले, तसेच पोलिसांनी तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या प्रियकरालाही बलात्कारासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून ताब्यात घेतले. दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

(संपादन - दीनानाथ परब)

loading image