esakal | Coronavirus: मुंबईत मृतांच्या आकड्याने गाठला उच्चांक

बोलून बातमी शोधा

corona dead body

दिलासादायक गोष्ट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर

Coronavirus: मुंबईत मृतांच्या आकड्याने गाठला उच्चांक
sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: शहरात शुक्रवारी मृत्यूने उच्चांक गाठला असून दिवसभरात 89 रुग्णांनी कोरोनामुळे जीव गमावला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 13 हजार 161 वर पोहोचला आहे. आज मृत झालेल्यापैकी 42 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 56 पुरुष तर 33 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  32 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 54 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. आज 3 हजार 925 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 6 लाख 48 हजार 624 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 61 हजार 433 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.78 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

हेही वाचा: १२ कोटी डोस एकरकमी चेकने विकत घेण्याची तयारी आहे- उद्धव ठाकरे

मुंबईत कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 54 लाख 23 हजार 998 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.78 टक्के आहे. तर रुग्णदुपटीचा कालावधी कमी होऊन 87 दिवसांवर आला आहे. मुंबईत गुरुवारी 6 हजार 380 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5 लाख 72 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत सध्या 61 हजार 433 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत 112 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1 हजार 17 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 29 हजार 787 अतिजोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 932 करण्यात आले.

हेही वाचा: मास्क अन् दंड... उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश

धारावीत 23 नवे रुग्ण तर दादरमध्ये ४३ कोरोनाबाधितांची वाढ

धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून धारावीत आज 23 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6 हजार 445 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 43 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 868 झाली आहे. माहीम मध्ये 59 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8 हजार 966 इतके रुग्ण झाले आहेत. मुंबईप्रमाणे जी उत्तरमधील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जी उत्तरमध्ये आज 125 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24 हजार 279 झाली आहे.