esakal | 'गेटवे'जवळ समुद्रात पडली महिला, पाठोपाठ फोटोग्राफरनेही घेतली उडी अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

'गेटवे'जवळ समुद्रात पडली महिला, फोटोग्राफरनेही मारली उडी अन्...

'गेटवे'जवळ समुद्रात पडली महिला, फोटोग्राफरनेही मारली उडी अन्...

sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: गेट वे ऑफ इंडिया या मुंबईतील गर्दीचा परिसर. येथे कायम लोक पर्यटनासाठी येतात. लॉकडाउन काळात इथे गर्दी कमी होती. पण आता पुन्हा हळूहळू बाहेरच्या शहरातील आणि राज्यातील लोक येथे पर्यटनाला येऊ लागले आहेत. अशातच मुंबईत भरदिवसा एक थरारक घटना पाहायला मिळाली. समुद्रात वाकून बघणाऱ्या एका महिलेचा तोल गेला आणि ती समुद्रात पडली. या वेळी तेथील काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्या महिलेला वाचवलं. (Mumbai woman fell in sea near gateway of India photographer saved her life)

हेही वाचा: "तर त्याच मशालीने विमानतळ जाळून टाकू"; उद्धव ठाकरेंना इशारा

नक्की काय घडलं?

गेट वे ऑफ इंडिया येथे ती महिला जात असताना समुद्रात वाकून पाहत होती. त्या महिलेचा तोल गेला आणि ती महिला समुद्रात पडली. त्यावेळी तेथे एक 50 वर्षांच्या आसपास वय असणारा फोटोग्राफर होता. त्या व्यक्तीने क्षणार्धात त्या महिलेच्या पाठोपाठ समुद्रात उडी मारली. या व्यक्तीचे नाल गुलाबचंद गौंड होते. तो गेटवे येथे फोटोग्राफी करत होता. या व्यक्तीने उडी मारल्यानंतर उपस्थित नागरिक व पोलिसांनी पटकन महिलेला वाचवण्यासाठी ट्युब फेकली. त्यावेळी त्या व्यक्तीने ट्युबच्या सहाय्याने महिलाला पाण्याबाहेर सुखरूप काढले आणि महिलेचे प्राण वाचवले.

हेही वाचा: "लोकलने प्रवास करू द्या किंवा मुंबईकरांना ५ हजार भत्ता द्या"

20 फूट खोल समुद्रात ही महिला बुडाली होती अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. माहिती मिळताच तातडीनं पोलीस आणि NDRF यंत्रणा कामाला लागली होती. सेल्फी घेत असताना तोल जाऊन ती समुद्रात पडल्याचे काहींना सांगितलं. पण अखेर त्या महिलेला वाचवण्यात बाकीच्या नागरिकांना यश आले.

loading image