Mumbai Crime: शेजाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून धारदार शस्त्रानं हल्ला! मुलीचा मृत्यू, आई गंभीर

पोलिसांनी या प्रकरणी दोन जोडप्यांना म्हणजेच एकूण चार जणांना अटक केली आहे.
Mumbai Crime: शेजाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून धारदार शस्त्रानं हल्ला! मुलीचा मृत्यू, आई गंभीर
Updated on

मुंबईत एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. शेजारील मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून माय-लेकीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला तर तीची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जोडप्यांना मंगळवारी अटक केली. (Marathi Tajya Batmya)

Mumbai Crime: शेजाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून धारदार शस्त्रानं हल्ला! मुलीचा मृत्यू, आई गंभीर
Chandrayan 3: चांद्रयान 3 मोहिमेसाठी ISRO सज्ज; पुढील महिन्यात 'या' तारखेला होणार लॉन्च?

देवनार पोलिसांच्या माहितीनुसार, "तक्रारदार अंजली भोसले यांनी म्हटलं की, "कृष्णा पवार या व्यक्तीचा भाऊ घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडला राहतो, त्याचा मंगळवारी मृत्यू झाला त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कारही पार पडले. तक्रारदार भोसले यांचं कुटुंब मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शेजारीच राहतात, पण ते मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत.

याचा राग मनात धरुन कृष्णा पवार यानं अंजली भोसले यांच्या आईवर धारदार शस्त्रानं हल्ला केला. यावेळी अंजली यांच्या बहिणीनं आपल्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण चिडलेल्या कृष्णानं तिला धारदार चाकूनं अनेकदा भोसकलं. त्यामुळं तिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई यामध्ये गंभीर जखमी झाली" (Latest Marathi News)

Mumbai Crime: शेजाऱ्यांच्या अंत्यसंस्काराला गेले नाहीत म्हणून धारदार शस्त्रानं हल्ला! मुलीचा मृत्यू, आई गंभीर
Extortion case: समीर वानखेडेंना दिलासा! हायकोर्टाकडून 5 जुलैपर्यंत अटकेपासून संरक्षण

तक्रारीनुसार, पोलिसांनी कृष्णा पवार याला अटक केली असून त्याची बायको आणि दुसऱ्या एका दाम्पत्याला देखील ताब्यात घेतलं आहे, कारण त्यांचाही या हल्ल्यामध्ये सहभाग होता. एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ नुसार हत्येचा आणि कलम ३०७ नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com