esakal | तु सिंगल आहेस? व्हेंटिलेटरसाठी मागितली मदत पण घडलं भलतचं

बोलून बातमी शोधा

mobile
तु सिंगल आहेस? व्हेंटिलेटरसाठी मागितली मदत पण घडलं भलतचं
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सध्या मुंबईसह देशभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचारांसाठी ऑक्सिजन, बेड्स आणि वेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची मागणी करतायत. मुंबईत राहणाऱ्या एका महिलेने अशीच सोशल मीडियावरुन मदत मागितली होती. तिला गंभीर आजारी असलेल्या आपल्या नातेवाईकासाठी व्हेंटिलेटर आणि प्लाझ्माची गरज होती. तिने त्यासाठी टि्वटरवर तिचा फोन नंबर शेअर केला. तिने टि्वटरवरुन मदत मागितल्यानंतर तिला वेंटिलेटर मिळाला पण त्याचबरोबर इतरही अन्य त्रासदायक गोष्टी मागे लागल्या.

नेमकं काय घडलं?

"टि्वटरवरुन मी इमर्जन्सीमध्ये मदत मागितल्यानंतर दुसऱ्यादिवशी मला मिनिटाला तीन ते चार फोन येत होते. मी रक्त पेढयांशी, जे डोनर आहेत, त्यांच्याशी बोलत होते." असे या महिलेने अनुभव कथन करताना व्हाईसमध्ये लिहिले आहे. "काही फोन कॉल्स हे उपयोगाचे नव्हते. निराशा करणारे होते. काही फोन कॉल्स प्रामाणिकपणे मदतीची विचारणा करण्याच्या हेतूने येत होते. काही कॉलरने या महिलेला तू सिंगल आहेस का ?" म्हणूनही विचारणा केली. तू सिंगल आहेस का? म्हणून विचारणा करणारा फक्त एकच फोन कॉल नव्हता, तर तिला अनेकांनी अशा पद्धतीचे नको ते प्रश्न विचारले. काही जणांनी तिला फोटो शेअर करु शकतेस का? म्हणूनही विचारणा केली.

हेही वाचा: मुंबईकरांसाठी एक मोठी चांगली बातमी

काही जणांनी तिला फोटो शेअर करु शकतेस का? म्हणूनही विचारणा केली. काहींनी डीपी सुंदर आहे म्हणून सांगितलं. काहींनी डेटबद्दल विचारलं, खूपच घाणेरडे अनुभव आल्याचे त्या महिलेने १५ एप्रिलच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: TRP मागे पळू नका, जबाबदारीने बातम्या द्या - मुंबई हायकोर्ट

१६ एप्रिलच्या सकाळी तिला सहाजण एकाचवेळी व्हिडीओ कॉल करत होते. धक्कादायक म्हणते तिला, तीन अश्लील फोटो पाठवण्यात आले होते. वैद्यकीय इमर्जन्सीच्या काळातही पुरुष असा विचार करत असतील, तर महिला कधीही त्यांचा नंबर सार्वजनिक पद्धतीने शेअर करणार नाहीत असे या महिलेने म्हटले आहे.