महिलांसाठी लोकल सेवा किती सुरक्षित? विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये दीडपट वाढ

कोरोनामुळे मागील गेल्या दोन वर्षांत लोकल रेल्वे संदर्भात सामान्य प्रवाशांना प्रतिबंध असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान मुंबईत महिला संबंधित गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले.
Crime
Crimesakal
Summary

कोरोनामुळे मागील गेल्या दोन वर्षांत लोकल रेल्वे संदर्भात सामान्य प्रवाशांना प्रतिबंध असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान मुंबईत महिला संबंधित गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले.

- केदार शिंत्रे

मुंबई - कोरोनामुळे मागील गेल्या दोन वर्षांत लोकल रेल्वे संदर्भात सामान्य प्रवाशांना प्रतिबंध असल्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान मुंबईत महिला संबंधित गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनानंतर लोकल रेल्वे प्रवासात सामन्यासाठी निर्बंध हटल्यानंतर या वर्षी मात्र मुंबई लोकल रेल्वेत प्रवासादरम्यान विनयभंगाच्या गुन्ह्यांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवासा दरम्यान महिला प्रवाशांच्या विनयभंगाची 62 प्रकरणे नोंदवण्यात आली. सुखद बाब म्हणजे या प्रकरणातील 90% आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या वर्षी नोंदवण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची संख्या मागील दोन वर्षांतील एकूण प्रकरणांच्या जवळपास समान आहे

विनयभंगाच्या गुन्ह्यात दीडपट वृध्दी

मुंबईत लोकल प्रवासादरम्यान जानेवारी-सप्टेंबर 2022 मध्ये 62 महिलांशी विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले. तर 2020 मध्ये विनयभंगाच्या 43 प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि 2021 मध्ये 24 प्रकरणे नोंदवली गेली होती. 2021 च्या तुलनेत या वर्षी दीडपट वाढ झाल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. 2019 दरम्यान विनयभंगाच्या 100 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली. दिलासादायक म्हणजे पोलिसाची कामगिरी प्रकरणे तडीस नेण्यात उल्लेखनीय आहे. पोलिसांनी अशा प्रकरणात 90% आरोपींना अटक केलेली आहे कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक वर्क फ्रॉम होम काम करत असल्याने ही आकडेवारीतील संख्या अजूनही कोरोनापूर्वीच्या काळा इतकी जास्त नाही. कोविडमुळे लोकल सेवा सामान्य प्रवाशांना प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या.

साल. प्रकरणे प्रकरणाची उकल

2022. 62. 58

2021. 24. 22

2020. 43. 36

2019. 105. 96

पोलिसांच्या उपाययोजना

रेल्वे पोलिसांनी त्यांच्या बहुतांश महिला कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये पेट्रोलिंग करता तैनात करण्यात आले आहे. मुंबईत रेल्वे पोलिसातील महिला कर्मचारी पुरुष सहकार्‍यांसह संयुक्तपणे 39 पॅसेंजर ट्रेनचे एस्कॉर्टिंग करत आहेत. रेल्वे पोलिसांनी सुरू केलेली ‘मेरी सहेली’ नावाच्या मोहीमे अंतर्गत 28 ट्रेनमध्ये 200 पोलीस कर्मचारी उपस्थित असतात. आयुक्तांनी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना रोटेशन ड्युटी लावल्या आहेत ज्यात दर काही तासांनी एका पोलिसाला गस्त घालण्यासाठी दुसर्‍या रेल्वे स्थानकावर जावे लागते आणि त्याच्या जागी दुसऱ्या स्थानकावरून येणारा दुसरा कर्मचारी नियुक्त केला जातो. जेणेकरून पोलीस गस्तीत कमतरता राहू नये. 'जीआरपीने या वर्षी जानेवारी-सप्टेंबरमध्ये नोंदवलेल्या सुमारे 94% विनयभंगाच्या घटनांचे निराकरण केले आहे.

कारणे

महिलांमध्ये त्यांच्या हक्कांबद्दल आणि गुन्ह्यांची नोंद करण्याबाबत महिलामधली जनजागृती हे प्रामुख्याने प्रकरण नोंदणीच्या वाढण्याची कारणे सांगितली जात आहे. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा तपासासाठी नवीन पथके जाहीर केली जातात पण कालांतराने मंदावल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत गुन्ह्याचा तपास करताना अधिकाऱ्यांना प्रकरणाचा मागोवा घेणे महत्वाचे आहे. नियम आणि कायद्याचे संस्थात्मक पालन करणे पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणात संवेदनशीलता दाखवणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. अधिक दृश्यमान पोलिसिंग आणि सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण नक्कीच कमी होउ शकते.

आम्ही आमच्या महिला तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये एस्कॉर्टिंग साठी नेमलेले आहे. मेरी सहेली या उपक्रमांतर्गत अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आळा कसा बसेल यावर आम्ही खास लक्ष केंद्रित केले आहे. 28 ट्रेनमध्ये 22 200 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिसिंग साठी तैनाती करण्यात आली आहे. महिलांमधील जनजागृती हे सुद्धा गुन्हे नोंदणीत वाढीचे एक कारण आहे.

- ऋषी शुक्ला, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com