मुंबईकरांनो तयार राहा, कारण उद्यापासून पासून पुन्हा धुवाधार पाऊस आणि बरंच काही

समीर सुर्वे
Sunday, 9 August 2020

मुंबईसह कोकण किनारपट्टीवर येत्या एक दोन दिवसात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबईसह कोकण किनारपट्टीवर येत्या एक दोन दिवसात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवला आहे. आठवडाभर कोकणात धुवाधार पावसाची शक्यता आहे. रविवारपर्यंत अरबी समुद्रात वार्यांचा वेग ताशी 75 किलो मिटर पर्यंत राहाणार आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी  - मिस इंडिया ते UPSC टॉपर, रातोरात प्रकाश झोतात आलेल्या ऐश्वर्याने का घेतली पोलिसात धाव ?
 

शुक्रवारपासून मुंबईसह महामुंबईत पावसाचा जोर ओसरला असला तरी दिवसभर काळे ढग दाटून आलेले दिसतायत. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सिंधुदूर्ग पासून रायगड पर्यंत ही परीस्थीती कायम राहाणार असून मंगळवार पासून सिधूदुर्ग रत्नागिरीत पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारपासून दक्षिण कोकणातील काही ठिकाणी अतिमुसळधार 200 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. मुंबई ठाण्यात मंगळवार पासून जोरदार पावसाचा अंदाज आहे.

महत्त्वाची बातमी - लॉकडाऊनचा असाही फायदा; डिसेंबर ते मार्च महिन्यात जन्मलेल्या बाळांबाबत महत्वपूर्ण माहिती समोर 

रविवारपर्यंत गोव्यासह संपुर्ण कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला राहाणार असून समुद्रात 75 किलोमिटर वेगापर्यंत वारे वाहातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळेे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याची शिफारस वेधशाळेने केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

mumbaikar be ready for heavy mumbai rains IMD predicts heavy rainfall from monday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbaikar be ready for heavy mumbai rains IMD predicts heavy rainfall from monday