लॉकडाऊनचा असाही फायदा; डिसेंबर ते मार्च महिन्यात जन्मलेल्या बाळांबाबत महत्वपूर्ण माहिती समोर 

भाग्यश्री भुवड
Saturday, 8 August 2020

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही काही उदाहरणे आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. डिसेंबर ते मार्च महिन्यात प्रसूती झालेल्या नवजात बालकांच्या आरोग्याला फायदा झाला आहे.

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात मार्च महिन्यापासून ते ऑगस्टपर्यंत मुंबईसह अनेक ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांचे खूप नुकसान झाल्याचे आपल्या निदर्शनास आले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनकपात झाली, आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले. तसेच लॉकडाऊनमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडल्याचे अनेक उदाहरणे समोर आली. मात्र, लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाल्याचेही काही उदाहरणे आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. डिसेंबर ते मार्च महिन्यात प्रसूती झालेल्या नवजात बालकांच्या आरोग्याला फायदा झाला आहे.

...म्हणून लोकलची प्रवासी क्षमता वाढवायला हरकत नाही; टाटा इन्स्टिट्यूटने दिली महत्वाची माहिती

डिसेंबर ते मार्च या कालावधीत जन्मलेल्या नवजात बालकांना या काळात आईचे दूध मिळण्यास मदत झाली. यामुळे बालकांची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत झाली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जागतिक स्तनपान सप्ताह सुरु झाला असून या निमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दीपा काला यांनी हे निरीक्षण मांडले. कोरोनामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे, मात्र कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यामुळे प्रसूत झालेल्या विशेषतः नोकरी करत असलेल्या मातांना योग्यपद्धतीने स्तनपान करता आले. आईच्या दूधाची तुलना कोणत्याच आहाराशी करता येत नाही. आईच्या दुधात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, हार्मोन्स, संप्ररेके असतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारापासून बाळांचा बचाव होतो. त्यानिमित्त डॉ. दीपा काला यांनी जागतिक स्तनपान सप्ताहमध्ये महिलांना स्तनपानाचे महत्व सांगितले. 

शैक्षणिक वर्ष तर सुरु झाले, मात्र विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांपुढे अडचणींचाच डोंगर

आईच्या दूधात असलेले काही विशिष्ट घटक हे मेंदूच्या विकासासाठी महत्वाचे असल्याचे सांगण्यात आले. मात्र, लॉकडाउन काळात अनेक प्रसूत महिला या घरी होत्या, काही जणी वर्क फ्रॉम होम करत होत्या. त्यामुळे त्यांना नवजात बाळांना स्तनपान करताना तसेच त्यांची काळजी घेता आल्याचे निदर्शनास आले आहे. बाळाला साधारणपणे एक ते दीड वर्षापर्यंत स्तनपान करणे फार गरजेचे असते, मात्र शहरांमध्ये अनेक महिला नोकरी करणाऱ्या असल्याने हा कालावधी तीन ते सहा महिने असतो.  

हातमागावरील वस्त्रांना प्रोत्साहन द्या; बॉलीवूड अभिनेत्रींनी केले महत्वपूर्ण आवाहन

1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या आठवड्यामध्ये स्तनपानाचे महत्व सांगण्यासाठी प्रसूत मातांना मार्गदर्शन केले जाते. त्याबाबतचे गैरसमज या सर्वाविषयी मार्गदर्शन करुन मातेने बाळाला स्तनपान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: babies born in between december to march are healthist child