मुंबईकरांनो सावधान! पुढील चार दिवस मुसळधार पाऊस, IMDचा इशारा

मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकणात मॉन्सूनचं आगमन झालं आहे.
Mumbai Rain
Mumbai RainFile Photo

मुंबई : मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकणात मॉन्सूनचं आगमन झालं आहे. शहरात आज मुसळधार पावसानं हजेरी लावली. पण मुंबईसाठी पुढील पाच दिवसही मुसळधार पावसाचे राहतील असा अंदाज हवामान खात्यानं (IMD) वर्तवला आहे. आज रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला असला तरी पुढील चार दिवसांसाठी शहराला येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. IMD मुंबईच्या वैज्ञानिक शुभांगी भूते (Shubhangi Bhute) यांनी ही माहिती दिली. (Mumbaikar beware IMD warns of torrential rains for next four days)

भूते म्हणाल्या, "कोकण किनारपट्टीसाठी येलो आणि रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसाठी आज रेड अॅलर्ट तर पुढील चार दिवसांसाठी येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे."

Mumbai Rain
शेतकरी आंदोलन: आतापर्यंत 500 जणांचा मृत्यू; राहुल गांधींनी व्यक्त केला पाठिंबा

दरम्यान, राज्यात मुंबई, पालघर, ठाणे, नागपूरपर्यंत मॉन्सूनचं आगमन झाल्याची माहिती पुण्यातील हवामान खात्याचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच आज ९ जून रोजी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचं भूते यांनी सागितलं.

Mumbai Rain
लग्नच नाही, तर घटस्फोट कसला? नुसरतचा खुलासा

पहिल्याच दिवशी त्यानं मुंबई आणि परिसराला झोडपून काढलं आहे. पहिल्याच पावसात सखल भागासह शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. त्यामुळं उपनगरीय रेल्वेसह अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या तसेच नागिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com