esakal | चिंतेचे ढग ! मुंबईकरांवर यंदा पाणीबाणी ? पाणीकपातीचे संकट अधिक गडद... 
sakal

बोलून बातमी शोधा

चिंतेचे ढग ! मुंबईकरांवर यंदा पाणीबाणी ? पाणीकपातीचे संकट अधिक गडद... 

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघ्या साडेतीन  महिन्याचा पाणीसाठा जमा आहे.

चिंतेचे ढग ! मुंबईकरांवर यंदा पाणीबाणी ? पाणीकपातीचे संकट अधिक गडद... 

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघ्या साडेतीन  महिन्याचा पाणीसाठा जमा आहे. त्यातच जूलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होत आलेला असतानाही पावसाने जोर पकडलेला नाही. त्यामुळे शहरावर पाणीकपातीचे संकट गढद होत असून जूलै अखेरीस किंवा ऑगटच्या पहिल्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका प्रशासन जूलै महिन्याच्या शेवटी अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेते. या बैठकीत पाणी कपातीवर निर्णय होऊ शकतो.

मुंबईला दररोज 3900 दक्षलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. सध्या तलावामध्ये 4 लाख 19 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा असून तो 107 दिवसांसाठी पुरु शकेल. तर वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी साडे चौदा लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. मुंबई ठाण्यात जूलै ऑगस्ट महिन्यात मोसमातील 60 ते 70 टक्के पाऊस होतो. पण यंदा जूलै महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा या प्रमुख तलावासह मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा हे तलाव ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्ह्यात जूलै अखेर पर्यंत 1400 ते 1500 मिमी पाऊस होतो. मात्र,यंदा सरारीसच्या 5 ते 10 टक्के कमी पाऊस झाला आहे.

मोठी बातमी यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, पण माझ्या वाढदिवशी 'हे' करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सरासरीपेक्षा जास्त पण 

मुंबई उपनगरात यंदा सरासरी पेक्षा 40 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मात्र, अद्याप तुळशी तलाव भरलेला नाही. गेल्या वर्षी तुळशी तलाव जूलैच्या पहिल्या पंधरावड्यात ओसंडुन वाहू लागला होता. तर यंदा तलाव ओसंडून वाहाण्यास काही फुटांचे अंतर बाकी आहे.

तलावातील पाण्याची पातळी (मिटर) आणि पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

तलाव - पुर्ण पातळी-- आजची पातळी -- साठा 

  • अप्पर वैतरणा - 603.51 -- 596.26 -- 20586
  • मोडकसागर -- 163.15 -- 152.23 -- 48223
  • तानसा -- 128.63 -- 121.81 -- 34839
  • मध्य वैतरणा -- 285.00 -- 256.60 -- 55085
  • भातसा --142.07-- 120.72 -- 235791
  • विहार -- 80.12 -- 87.00 -- 16846
  • तुळशी -- 139.17 -- 139.10 -- 7949

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षी यावेळेपर्यंत सात महिन्याचा पाणीसाठा जमा होता. तर 2018 मध्ये 10 महिन्यांचा साठा होता.

( संकलन - सुमित बागुल ) 

mumbaikar might face water cut soon as there is no proper rainfall till july end