esakal | यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, पण माझ्या वाढदिवशी 'हे' करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, पण माझ्या वाढदिवशी 'हे' करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी द्या, आरोग्य तपासणी, रक्तदान, प्लाझ्मा दान शिबिरे आयोजित करा'

यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, पण माझ्या वाढदिवशी 'हे' करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

sakal_logo
By
सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई: राज्यात कोरोनाचं सावट आहे. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यंदाचा वाढदिवस साजरा करणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. "यंदाचा वाढदिवस आपण साजरा करणार नसून सध्याच्या कोरोना परिस्थितीत कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसेच हार तुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीस सढळ देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत", असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे. 

"आपल्याला दिलेल्या शुभेच्छा या सर्व कोविड योद्ध्यांना समर्पित करीत आहोत असेही ते म्हणाले. 27 जुलै रोजी आपल्या वाढदिवशी कुणीही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लाऊ नये किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये", असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

VIDEO : कोळी बांधवाना लॉकडाऊनचा असाही बसतोय फटका, मोठ्या कष्टाने पकडलेली मासोळी विकणं झालं मुश्किल..

गेल्या 4 महिन्यांभपासून राज्य सरकार नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने कोरोनाची लढाई लढत आहे आणि आपल्या प्रयत्नांमुळे काही चांगले परिणामही दिसत आहेत. कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे आता उलटपक्षी आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायचे आहे,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जन आरोग्य तपासणी शिबिरे घ्यावीत, मोठ्या प्रमाणावर रक्तदान, प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले आहे.

महत्त्वाची बातमी : अशी वेळ कुणावरही येऊ नये ! स्वतःच्या रुग्णालयातही व्हेंटिलेटर मिळाला नाही आणि शेवटी..

( संपादन - सुमित बागुल )

maharashtra CM uddhav thackeray will not celebrate this years birthday