कोरोनाशी ध्यैर्याने लढताहेत मुंबईकर, नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत घट

भाग्यश्री भुवड
Monday, 30 November 2020

मुंबईत कोरोना आजाराचे प्रमाण कमी होण्याबरोबरच मृतांची संख्याही नोंदली कमी गेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत 61 टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार असे स्पष्ट होते की, मुंबईकर कोरोनाबरोबर ध्यैर्याने लढत आहेत.

मुंबई: मुंबईत कोरोना आजाराचे प्रमाण कमी होण्याबरोबरच मृतांची संख्याही नोंदली कमी गेली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये मृतांच्या संख्येत 61 टक्क्यांनी घट झाली आहे. आकडेवारीनुसार असे स्पष्ट होते की, मुंबईकर कोरोनाबरोबर ध्यैर्याने लढत आहेत.

देशाच्या उत्तर राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवीन प्रकरणे असो की मृत्यूची आकडेवारी, दोघांमध्येही दुसर्‍या लाटेनंतर सुधारणा दिसत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दिवाळीनंतर मुंबईत नवीन घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही विशेष वाढ दिसून आलेली नाही. शहरात कोरोनाची 1000 ते 1100 नवीन प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत.

मुंबईकरांसाठी सर्वात चांगली बातमी अशी आहे की, कोरोनातून होणाऱ्या मृतांची संख्या कमी झाली आहे. पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये कोरोना ग्रस्त 1319 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  नोव्हेंबरमध्ये या विषाणूमुळे 513 रुग्णांचा मृत्यू झाला. वरील आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते की मृतांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 

पालिका उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, 'मुंबईत कोरोना रुग्णांची गती आता कमी झाली आहे. नोव्हेंबरमध्येही प्रकरणांची संख्या कमी झाली आहे. लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. लोकांना लक्षणे आढळली की त्वरित तपासणीसाठी येतात. एकूणच वेळेवर तपासणी आणि उपचारांमुळे मृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

अधिक वाचा-  सरनाईक पिता-पुत्राची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता
 

प्रोटोकॉलमध्ये बदल आणि अनुभवाचा वापर

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या खरोखर चिंतेची बाब आहे. आम्ही जलद मृत्यूंचा आढावा घेतला. त्यानंतर, उपचारांच्या प्रोटोकॉलमध्ये बदल केले. बर्‍याच रूग्णांवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनाही बराच अनुभव येतो. त्या अनुभवाचा उपयोग करून, डॉक्टर रुग्णाला बरे करण्यात यशस्वी होत आहेत.
डॉ अविनाश सुपे, प्रमुख, मृत्यू विश्लेषक समिती, संचालक हिंदुजा रुग्णालय, खार

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉमोरबिडीमुळे बहुतेक मृत्यू

मुंबईत आतापर्यंत एकूण 10,773 कोरोना ग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील निम्म्याहून अधिक रुग्ण आधीच इतर आरोग्य समस्यांसह झगडत आहेत. मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन रोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, यकृताचा आजार असलेले लोक कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यास त्यांचे आरोग्य आणखी खराब होते. त्यातून मृत्यू ओढावतो. 
डॉ. दक्षा शहा, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

वेळेवर तपासणी आणि उपचार

मुंबईत 300 चाचणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. लोक कोरोना चाचणी विनामूल्य करू शकतात. लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. चाचणीसाठी लोकांना दूर जाण्याची देखील गरज नाही. जेव्हा लक्षणे आढळतात तेव्हा लोकांची त्वरित तपासणी केली जाते. जे लोक त्यांच्या संपर्कात येतात त्यांचा अहवाल लगेच पॉझिटिव्ह आल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाते. अशा परिस्थितीत विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखले जात आहे. वेळेवर तपासणी आणि उपचारांमुळे रुग्णांचा जीव वाचवण्यात मदत होते.
सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त, आरोग्य, पालिका

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbaikars bravely fight Corona 61 per cent drop death toll November compared October


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars bravely fight Corona 61 per cent drop death toll November compared October