मुंबईकरांसाठी खुशखबर! मालमत्ता कराबाबत BMCने घेतला मोठा निर्णय; कोरोना संकटामुळे दिलासा

सुनिता महामुणकर
Sunday, 20 September 2020

महापालिकेने यंदा मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या मुंबईकरांना असा निर्णय झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे

मुंबई : महापालिकेने यंदा मालमत्ता करवाढ न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या मुंबईकरांना असा निर्णय झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता करात दर पाच वर्षांनी 40 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची कायद्यात तरतूद आहे. ही पाच वर्षांची मुदत या वर्षी संपत होती. मात्र, यंदा कर न वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे समजते. 

Breaking : मुंबईत खासगी व सहकारी बॅंकेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी

मागील वर्षी 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला होता. यंदाही 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची राज्य सरकारची परवानगी मिळणे गरजेचे आहे. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळेला नाही. 
....
गेल्या वर्षी 335 कोटींचे नुकसान
मुंबईतील 4 लाख 20 हजार मालमत्ता धारकांकडून करवसूल केला जातो. त्यातील 1 लाख 37 हजार मालमत्ता धारकांची घरे 500 चौरस फुटा पेक्षा कमी आहेत. गेल्या वर्षी या मालमत्ता धारकांना करमाफी दिल्याने पालिकेला 335 कोटींचे नुकसान झाले होते.

कळंबोलीत रात्रीच्या अंधारात असंख्य झाडांची कत्तल; पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल

तब्बल 24 टक्के हिस्सा
मालमत्ता कर मुंबई महापालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख स्त्रोत असून एकूण महसुलाच्या 24 टक्के उत्पन्न मालमत्ता करातून मिळते. यंदाच्या वर्षात पालिकेला मालमत्ता करातून 6 हजार 788 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज होता. मात्र, करवाढ केली नाही तर पालिकेचा किती महसुल कमी होईल याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbaikars get rid of property tax this year