Breaking : मुंबईत खासगी व सहकारी बॅंकेच्या 10 टक्के कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी

दीपा कदम
Saturday, 19 September 2020

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सहकारी आणि खासगी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. खासगी आणि सहकारी बॅंंकांच्या 10 टक्केच कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई - मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सहकारी आणि खासगी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. खासगी आणि सहकारी बॅंंकांच्या 10 टक्केच कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मागितली होती, त्यानुसार सर्व सहकारी व खासगी बँकांच्या एकूण कर्मचार्‍यांच्या १०% मर्यादेपर्यंत कर्मचार्‍यांना मुंबई उपनगरी नेटवर्कवर विशेष उपनगरी सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली; राज्यातील महत्वपुर्ण प्रश्नांवर झाली चर्चा

या निवडक १०% बँक कर्मचार्‍यांनी  महाराष्ट्र राज्य सरकारकडून, स्टेशन प्रवेशासाठी, लवकरात लवकर क्यूआर कोड मिळवावा. तोपर्यंत वैध ओळखपत्रासह स्थानकांवर प्रवेश देण्यात येईल. महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानकांवर  प्रवाशांसाठी अतिरिक्त बुकिंग काऊंटर सुरू केले जातील.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु; महास्वयं संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन

कोव्हिड नियम आणि सोशल डिस्टंन्सिंगचं पालन 

 राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक प्रवर्गातील कर्मचारी वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी करू नये अशी विनंती केली जाते.
 प्रवाशांना कोविड-१९ साठी अनिवार्यपणे वैद्यकीय आणि सामाजिक प्रोटोकॉलचे अनुसरण करण्याची विनंती केली जाते. जनतेला विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
--------------------------------------------------


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mumbai 10 per cent of private bank employees are allowed to travel on local trains