Electricity
बापू सुळे
मुंबई : आरे-कुडूस आणि विक्रोळी-खारघरदरम्यानच्या उच्चदाब वीजवाहिन्या कार्यान्वित झाल्याने मुंबईकरांना राज्यात उपलब्ध असलेली वीज मिळणार आहे. आतापर्यंत मुंबईलगतच्या वीज प्रकल्पांमध्ये तयार होणाऱ्या विजेच्या तुलनेत राज्यात स्वस्त वीज असतानाही केवळ अपुऱ्या वीजवाहिन्यांमुळे ती मुंबईत आणण्याची अडचण होती; मात्र या दोन्ही वीजवाहिन्या सुरू झाल्याने बेस्ट, टाटा पाॅवर आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीला गरजेनुसार दोन हजार मेगावाॅटपर्यंत वीज मुंबईत आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रतियुनिट ३५-४५ पैसे स्वस्त वीज मिळणार आहे.