esakal | पाचशेच्या खाली आलेला आकडा पुन्हा गेला नऊशेवर, मुंबईकरांनो कोरोनाला गृहीत धरू नका
sakal

बोलून बातमी शोधा

पाचशेच्या खाली आलेला आकडा पुन्हा गेला नऊशेवर, मुंबईकरांनो कोरोनाला गृहीत धरू नका

दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये, खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा पारिणाम आता कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय

पाचशेच्या खाली आलेला आकडा पुन्हा गेला नऊशेवर, मुंबईकरांनो कोरोनाला गृहीत धरू नका

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : दिवाळीदरम्यान बाजारांमध्ये, खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा पारिणाम आता कोरोना रुग्णसंख्येत झालेल्या वाढीच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. केवळ मुंबईतच नव्हे तर इतर मोठ्या शहरांमध्ये देखील हीच स्थिती आहे. मुंबईत आज कोरोनाचे 924 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,72,449 झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची हीच रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपूर्वी पाचशेच्या खाली आलेली होती. मात्र आज मुंबईत 924 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. 

महत्त्वाची बातमी : चायनीज हॉटेल्सचा चीनशी काय संबंध ? बेवकूफ शिवसैनिकांना हे कधी कळणार?", संजय निरुपम यांनी उडवली सेनेची खिल्ली

आज मुंबईत 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,624 वर पोहोचाल आहे. आज 1,192 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,49,903 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 92 टक्के इतका झाला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 310 दिवसांवर गेला आहे. तर 18 नोव्हेंबरपर्यंत एकूण 17,22,605 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 12 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील कोविड रुग्णवाढीचा दर 0.22 इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 12 मृत्यूंपैकी 10 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 10 पुरुष तर 2  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 1 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते, तर 11 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

महत्त्वाची बातमी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका; 24 तारखेला होणार सुनावणी

मुंबईत 439 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4,491 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 3,189 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 359 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbais covid patient count shoots above nine hundred after diwali 2020