esakal | उद्घाटनाआधीच दादरमध्ये ड्राइव्ह इन लसीकरणासाठी मोठी गर्दी

बोलून बातमी शोधा

दादर
उद्घाटनाआधीच दादरमध्ये ड्राइव्ह इन लसीकरणासाठी मोठी गर्दी
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत दादर पश्चिमेला कोहिनूर पब्लिक पार्किंग सेंटर येथे आजपासून ड्राइव्ह इन लसीकरणाला (drive in vaccination) सुरुवात होणार आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या ड्राइव्ह इन लसीकरण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. ड्राइव्ह इन लसीकरण म्हणजे तुम्ही तुमच्या स्वत:च्या गाडीतून इथे येऊ शकता. आरोग्य सेवक तुम्हाला गाडीतच कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देतील. देशातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. (Mumbais First Drive in Vaccination Centre Open Today in Dadar West cars coming in huge number)

उद्घटनाआधीच इथे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी झाली आहे. ४५ वर्षावरील, ज्येष्ठ नागरीकांचे आणि दिव्यांग व्यक्तींचे इथे लसीकरण होईल. कोहिनूरमध्ये दररोज ५ हजार व्यक्तींच्या लसीकरणाची व्यवस्था होऊ शकते. जवळपास २०० कार चालक इथे ड्राइव्ह इन लसीकरणासाठी येऊ शकतात.

हेही वाचा: एकमेकांना धमक्या देणं थांबवा, कोरोनाविरूद्ध एकत्र लढा- राऊत

"इथे मोठा पार्किंग लॉट आहे. ज्येष्ठ नागरीक तसेच सहव्याआधी असणारे रुग्ण बराच वेळ रांगेत उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे घरात लसीकरणाची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली होती. पण अशी परवानगी मिळाली नाही. आता नागरीकांना त्यांच्या स्वत:च्या गाडीत लस मिळू शकते. या ड्राइव्ह इन लसीकणासाठी नागरीकांना जास्तीत जास्त ३० मिनिट थांबावे लागेल. जे नागरीक या सुविधेचा लाभ घेणार, त्यांना फक्त पार्किंगचे चार्जेस द्यावे लागतील" असे अतिरिक्त महापालिका आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

हेही वाचा: 45 वर्षांवरील नागरिकांचं आज लसीकरण; घेता येणार कोविडचा दुसरा डोस

मागच्यावर्षी महापालिकेने याच पार्किंग लॉटचा ड्राइव्ह इन कोरोना चाचणीसाठी वापर केला होता. ड्राइव्ह इन लसीकरणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अशा प्रकारे लसीकरण करण्याचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ नागरीकांना यामुळे मोठा दिलासा मिळेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले.