मुंबईतील BKC जंबो कोविड केंद्राने रचला इतिहास, 10 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

भाग्यश्री भुवड
Wednesday, 21 October 2020

बीकेसीमध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याने 35 टक्के रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. म्हणजेच राज्यातूनही रुग्ण येथे दाखल होत आहेत.

मुंबई : मुंबईतील बिकेसी जंबो कोविड केंद्राने सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करुन देशात इतिहास रचला आहे. आतापर्यंत या केंद्रात 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 25 मे यादिवशी या केंद्रात पहिला कोरोना रुग्ण दाखल झाला होता. आतापर्यंत केंद्रात 10,300 रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. त्यापैकी 9,668 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सद्यपरिस्थितीत 682 रुग्ण दाखल आहेत. शिवाय, अनेक रुग्णांना निसर्ग वादळामुळे इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. 

बीकेसी येथे असणाऱ्या जंम्बो कोविड केंद्रात सध्या रुग्णांची वाढती संख्या आहे. कारण, इथे असलेल्या सुविधांमुळे फक्त मुंबईतीलच नाही तर राज्यातूनही रुग्ण दाखल होत आहेत. सध्या येथे 2000 खाटांपैकी 460 ऑक्सिजन बेड्स, 430 ऑक्सिजन नसलेले म्हणजेच जवळपास 800 बेड्स रिक्त आहेत. तर, आता सद्यस्थितीत 682 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इथे आयसीयूचे 108 बेड्स असून 82 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 16 बेड्स रिक्त आहेत. दरम्यान, इथले सर्वच्या सर्व व्हेंटिलेटर वापरात आहेत ज्याची क्षमता फक्त 42 आहे. 

महत्त्वाची बातमी : शिवसेनेचा क्रमांक घसरला, राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगतीपुस्तकात कोण अव्वल ?

बीकेसीमध्ये चांगल्या सुविधा मिळत असल्याने 35 टक्के रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. म्हणजेच राज्यातूनही रुग्ण येथे दाखल होत आहेत. सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड येथून रुग्ण येत आहेत. दरम्यान, आतापर्यंत 10 हजार रुग्णांवर उपचार केले गेले आहेत. -  डॉ. राजेश ढेरे, संचालक, बीकेसी कोविड केंद्र

कोविड केंद्रात जवळपास 18 डाॅक्टर्स, 24 नर्सेस, 30 वाॅर्डबाॅय एवढीच टीम होती जी आता वाढून यात सध्या 31 डाॅक्टरांचा समावेश आहे. 222 नर्सेस, 31 टेक्निशियन आणि 30 प्रशासकीय स्टाफ इथे आहे. म्हणजेच जवळपास 600 कर्मचारी 58 वाॅर्डमध्ये 24 तास रुग्णसेवा देत आहेत. 

राज्यातून रुग्णांची हजेरी -

या कोविड केंद्रात उपचार घेतलेले जवळपास 89 टक्के रुग्ण हे इतर आजारांनी त्रस्त होते. पण, त्यात ही कोणाचा मृत्यू झालेला नाही. ठाण्यातून 10 टक्के, भिवंडी 6 टक्के, कल्याण 3 टक्के आणि 2 टक्के हे पिंपरी चिंचवड, रायगड आणि सोलापूरमधून येत आहेत. 

महत्त्वाची बातमी : आता N95 मास्क मिळणार 19 ते 49 रुपयांपर्यंत, दुपदरी आणि तीन पदरी मास्क 4 रुपयांना

लवकरच सीटीस्कॅनची सुविधा - 

केंद्रात लवकरच सीटीस्कॅनची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. तसंच, पुढच्या चार दिवसांत 28 बेड्सचे हाय डेपेन्डन्सी युनिट सुरू केले जाणार आहेत. 

प्रशांत जाधव म्हणाले की, 19 तारखेला झालेल्या तपासणीत कोरोनाची लागण झाली. सुरुवातीला मला चेंबूरमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु तेथे माझी तब्येत सुधारत नव्हती, त्यानंतर माझ्या मित्राने मला बीकेसीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. माझ्या कुटुंबीयांनी मला बीकेसीमध्ये हलवले. पहिल्या दिवशी, मी खूप चिंताग्रस्त होतो, परंतु इथले डॉक्टर आणि नर्स यांनी मला खूप चांगले उपचार दिले. हा अनुभव पालिकेच्या कोविड केअर सेंटर प्रायव्हेटपेक्षा चांगला आहे. मी लोकांना सल्ला देतो की जर एखाद्याला कोरोनाचा त्रास झाला असेल तर त्यांनी या केंद्रात उपचारासाठी यावे.

( संपादन - सुमित बागुल )

mumbais jumbo covid care center makes history more than ten thousand covid patients cured from the center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbais jumbo covid care center makes history more than ten thousand covid patients cured from the center