शिवसेनेचा क्रमांक घसरला, राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगतीपुस्तकात कोण अव्वल ?

समीर सुर्वे
Tuesday, 20 October 2020

नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगती पुस्तकात काॅंग्रेस अव्वल ठरली आहे. 

मुंबई, ता. 20 : नगरसेवक आणि राजकीय पक्षांच्या वार्षिक प्रगती पुस्तकात काॅंग्रेस अव्वल ठरली आहे. तर, शिवसेनेचा क्रमांक घसरला आहे. पक्षिय कामगिरीत कॉंग्रेसने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरसेवकांच्या वैयक्तीक कामगिरीतही शिवसेनेचा क्रमांक घसरला आहे. प्रजा फांऊडेशन या संस्थेने सर्वेक्षण आणि माहितीच्या अधिकारा अंतर्गत मिळवलेल्या माहितीतून हा अहवाल तयार केला आहे.

प्रजा फांऊडेशनच्या वतीने दरवर्षी नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक प्रसिध्द केले जाते. यात, शिवसेनेचे नगरसेवक नेहमीच आघाडीवर असतात. तर, पालिकेतील पक्षिय कामगिरीतही शिवसेना पक्ष नेहमीच आघाडीवर असतो. मात्र, पक्षिय कामगिरीत शिवसेनेने तीसरा क्रमांक मिळवला आहे. तर, नगरसेवकांच्या कामगिरीवरुन ठरविण्यात आलेल्या पहिल्या दहा नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे अवघे दोन नगरसेवक आहेत. नेहमी पहिल्या दहा मध्ये किमान पाच ते सहा नगरसेवक हे शिवसेनेचे असायचे. यंदा पहिल्या दहा क्रमांकामध्ये भाजपचे पाच नगरसेक असून कॉंग्रेसचे तीन नगरसेवक आहे. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सातवा क्रमांक पटकावला असून भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी नववा क्रमांक पटकावला आहे.

महत्त्वाची बातमी : लोकल सर्वांसाठी सुरु करण्याच्यादृष्टीने महत्त्वाची पावलं, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

भाजपचे हरीष छेडा, नेहल शहा यांनी पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर, शिवसेनेचे बाळा नर हे तीसऱ्या क्रमांकावर असून शिवसेनेचे समाधान सरवणकर चौथ्या क्रमांकावर आहेत.

नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक तयार करताना सभागृहातील हजेरी, नगरसेवक निधीचा वापर, उपस्थीत केलेल्या प्रश्‍नांची संख्या, प्रश्‍नांचा दर्जा शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे, न्यायालयीन प्रकरणे या विविध निकषांवर नगरसेवकांचा क्रमांक ठरवला जातो.

3 वर्षात एकही प्रश्‍न नाही

मुंबईतील तीन नगरसेवकांनी 2017 पासून एक ही  प्रश्‍न विचारलेला नाही. यात कॉंग्रेसच्या सुप्रिया मोरे, एम आय एमच्या  गुलनाझ कुरेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मनिषा रहाटे यांनी गेल्या तीन वर्षात १ ही प्रश्‍न उपस्थीत केलेला नाही.

महत्त्वाची बातमी : दाऊदचा विश्वासू इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर टाच; ईडीची कारवाई

पाच शिवसेनेचे नगरसेवक

यंदा या तीन नगरसेवकांसह  13 नगरसेवकांनी एक ही प्रश्‍न उपस्थीत केलेला नाही. यात माजी महापौर शिवसेना नगरसेवक मिलींद वैद्य, संगिता सुतार, स्नेहल मोरे, मरीयम्मल थेवर, उर्मिला पांचाळ, भाजपचे शिवकुमार झा, रंजना पाटील कॉंग्रेसच्या निकीता निकम, विन्नी डिसूझा, अभासेच्या गिता गवळी यांचा समावेश आहे. प्रश्‍न न विचारलेल्या नगरसेवकांमध्ये शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक आहेत.

नागरिकांच्या समस्याच संपल्या ? 

सभागृहात नगरसेवकांकडून उपस्थीत कलेल्या प्रश्‍नांचे प्रमाण घटलेच आहे. त्याचबरोबर पाणी तुंबणे, मलनिःसारण, कचरा, पिण्याचे पाणी, रस्ते या पालिकेच्या मुलभूत कार्यशी संबंधीत मुद्द्यांवर प्रश्‍न विचारण्याचे प्रमाणही घटले आहे. या मुद्यांवर फक्त 10 टक्के प्रश्‍न विचारण्यात आले आहेत.  

yearly report card of political parties shivsena loses their top position congress on top


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yearly report card of political parties shivsena loses their top position congress on top