esakal | वाय-फाय अन टीव्ही असलेल्या मुंबईतल्या सार्वजनिक शौचालयाची गोष्ट
sakal

बोलून बातमी शोधा

वाय-फाय अन टीव्ही असलेल्या मुंबईतल्या सार्वजनिक शौचालयाची गोष्ट

वाय-फाय अन टीव्ही असलेल्या मुंबईतल्या सार्वजनिक शौचालयाची गोष्ट

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: सार्वजनिक शौचलय (public toilet) म्हटलं की, पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती, तुटलेल्या टाइल्स, उग्र दर्पयुक्त वास हे ठरलेलंच आहे. मुंबईकरांना हे अजिबात नवीन नाही. पण मुंबईत (Mumbai) जुहू भागात उभं राहिलेलं एक सार्वजनिक शौचालय मात्र अपवाद आहे. जुहू गली (juhu area) येथे दोन मजली (two story) सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे. या शौचालयाचे वैशिष्टय म्हणजे इथल्या प्रतिक्षागृहात न्यूज पेपर वाचण्याची व्यवस्था आहे. (Mumbais largest public toilet wifi access tv news paper in juhu area)

इथे तुम्हाला तुमच्या मोबाइलर अगदी सहज वाय-फायचा एक्सेस मिळू शकतो. टीव्हीची सुद्धा व्यवस्था आहे. चार हजार चौरसमीटर मध्ये पसरलेल्या दोन मजली शौचालयात तळमजल्यावर ६० टॉयलेट तर पहिल्या मजल्यावर २८ टॉयलेटस आहेत. मुंबई महापालिकेने या सर्वात मोठ्या शौचालयाची उभारणी केलीय. ६० हजार झोपडपट्टीधारकांना या सार्वजनिक शौचालयाचा फायदा होईल.

हेही वाचा: सध्याच्या लहान मुलांच्या आजारपणाचा तिसऱ्या लाटेशी संबंध जोडू नका, कारण...

या सार्वजनिक शौचालयांचा अमर्यादीत वापर करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला ६० रुपये आकारण्यात येतील. या शौचलय परिसरात एक छोट बॉटेनिकल बगीचा सुद्धा आहे. मुंबईतील हे फक्त सर्वात मोठ सार्वजनिक शौचालयच नाहीय, तर इथे दिवस-रात्र सफाई सुद्धा सुरु असते. वरचा मजला पुरुषांसाठी तर तळ मजला स्त्रियांसाठी आहे, असे काँग्रेस नगरसेवक मेहर मोहसीन हैदर म्हणाले. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी शनिवारी जुहू गल्लीतील या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन केले.

loading image