esakal | सध्याच्या लहान मुलांच्या आजारपणाचा तिसऱ्या लाटेशी संबंध जोडू नका, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

सध्याच्या लहान मुलांच्या आजारपणाचा तिसऱ्या लाटेशी संबंध जोडू नका, कारण...

सध्याच्या लहान मुलांच्या आजारपणाचा तिसऱ्या लाटेशी संबंध जोडू नका, कारण...

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई:  बदलत्या वातावरणात लहान मुलांना व्हायरल फिवरचा (Viral fever) धोका निर्माण झाला आहे. पालिका रुग्णालयाच्या ओपीडीतील (hospital opd) किमान 10 मुलांमध्ये सर्दी, खोकल्याच्या तक्रारी आढळत आहेत. मात्र, याचा सध्या तिसऱ्या लाटेशी (third wave) संबंध न लावता हा बदलत्या हवामानाचा परिणाम असून पालकांनी (parents) मुलांना त्यासंबंधित उपचार द्यावेत, असा सल्ला बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्सने दिला आहे. (In mumbai Viral fever cases among children increases dont compare it with third wave)

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याच्या दरम्यान मुंबईतील लहान मुले सध्या तापाने फणफणत आहेत. एवढेच नाही तर त्यांना सर्दी, खोकलाही होत आहे. यामुळे त्यांचे पालक आधीच चिंतीत आहेत, परंतु मुलांच्या कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांपासून ते मुलांचे डॉक्टर्स पालकांची चिंता कमी करण्यासाठी हा बदलत्या हवामानाचा परिणाम असल्याचे सांगत आहेत.

हेही वाचा: 'हौसले झुक ना पायेंगे...'; फडणवीसांचा सरकारला शायरीतून इशारा

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या लाटेत मुलांना जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या भीतीदरम्यान, आजकाल मुले ताप, सर्दी, खोकला आणि इतर आजारांना बळी पडत आहेत.

हेही वाचा: "सुधीरभाऊ, भित्रा ससा परवडला पण उद्धव ठाकरे नाही परवडणार"

हवामानाच्या बदलाचा परिणाम -

पालिकेच्या बालरोग कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, मुलांमध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याच्या तक्रारी वाढली आहे. परंतु, आता या आजारांना कोरोनासोबत जोडणे योग्य नाही. हवामानातील बदलांमुळे मुले आजारी पडत आहेत.

सायन रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की, दिवसभर ओपीडीमध्ये येणार्‍या मुलांपैकी जवळपास 10 मुलांमध्ये व्हायरल तक्रारी उद्वभवलेल्या दिसतात. जसजसा पाऊस वाढेल तसे मुले आजारी पडण्याच्या तक्रारी वाढतील. पण, लोकांनी घाबरुन जाऊ नये.

झोपडपट्टीमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांची संघटना युनायटेड मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. जाहिद खान यांनी सांगितले की, येथे दररोज 10 ते 12 मुले येतात ज्यांच्यात ताप, यकृताला सूज येणे या तक्रारी आढळतात. दरम्यान, मुलांमध्ये यकृत दाह होण्याचे कारण बाहेरील जंक फूड खाणे हे आहे. व्हायरल फिवरचे कारण हे बदलत्या हवामानाचा परिणाम आहे. अलीकडच्या दिवसांत मुसळधार पाऊस पडला आणि अचानक पाऊस थांबल्यामुळे उष्णता वाढली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम मुलांसह तसेच प्रौढांच्या आरोग्यावर होत आहे.

loading image