आश्चर्यजनक! मार्च महिन्यात मुंबईचा मृत्यूदर घसरला

mortality rate
mortality rate

मुंबई ः महाराष्ट्रालाही त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक आक्रमण झाले आहे ते मुंबईत.  कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही मुंबईत सर्वात जास्त आहे. कोरोनाचे एवढे मोठे संकट मुंबईवर असताना मार्च महिन्यात मुंबईतील मृत्यूदर चांगलाच कमी झाला आहे. होय,  कोरोनामुळे झालेले मृत सोडल्यास मुंबईतील मृतांची आकडेवारी तीन वर्षांच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाव्यतिरिक्त  5 हजार 669 जणांनी अखेरचा श्वास घेतला. गतवर्षी हाच आकडा 7 हजार 155 होता. तर 2018 मध्ये 7 हजार 436 आणि 2017 मध्ये 2 हजार 815 होता. कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता लक्षात घेता मुंबईत 12 मार्चपासून कठोरपणे निर्बंध घातलण्यात आले. 13 मार्चला शाळा आणि सिनेमागृह बंद झाली तर 14 मार्चपासून मॉलही बंद झाले. 19 मार्चपासून वर्क फ्रॉम होमचा आदेश काढण्यात आला. पुढे तर 22 मार्चपासून लोकल वाहतूक बंद झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश मुंबईकर आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. काही त्रास जाणवत असल्यास लगेचच चाचणी करुन घेत आहेत. वैयक्तिक स्वच्छताही राखली जात आहे. 

त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि लोकल वाहतूकही थांबली. त्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले. लोक आरोग्याची काळजी घेत आहेत, त्यामुळे मुंबईतील कोरोनाच्या मृत्यूंशिवाय अन्य मृत्यूंचे प्रमाण कमी झाले. अर्थात सर्व आकडेवारीचा नेमका अभ्यास झाल्यावरच मृतांचे प्रमाण कमी होण्याचे कारण सांगता येईल, असे मुंबई पालिकेतील आधिकाऱ्यांनी सांगितले. 

सध्या अनेक उद्योगधंदेही बंद आहेत. अनेक कंपन्यात काम सुरु नाही, त्यामुळे कामाचे प्रेशर नसल्याचे प्रमाणही कमी आहे. मात्र त्याचवेळी अनेकांनी इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया स्थगित आहेत. काही डॉक्टरांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. आपल्या अवतीभवती कुटुंबातील सर्वच सदस्य असल्याने त्यांच्याही व्याधी कमी झाल्या आहेत. त्याचबरोबर बाहेरचे खाणे बंद झाल्यामुळे अपचन किंवा त्यातून उद्भवणाऱ्या रोगांचाही त्रास होत नाही. घराबाहेर पडण्याचे कमी प्रमाण झाल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाणही सध्या कमी झाले असेल तसेच घराबाहेर असलेला धोकाही सध्या नाही, याकडेही एका आधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com