कोरोनामुळे मल्याळी नववर्षाचा उत्सव सुना सुना... 

vishu
vishu

मुंबई ः कोरोनाची साथ आल्याने यंदा अनेक सण-समारंभ रद्द करण्याची वेळ आपल्यावर आली. मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने गर्दी होणार नाही, असे अनेक उपक्रमांवर पाणी फिरवावे लागले. प्रथमच मुंबईकरांना या वर्षी मराठी नववर्ष साजरे करता आले नाही. कोरोनामुळे केवळ मराठी नववर्षही उत्साहाने साजरा करता आला नाही. आज विशू या मल्याळी नववर्षाला सुरुवात झाली, पण मल्याळी बहुसंख्य असलेल्या मुंबईतील भागातही त्याचा फारसा उत्साह जाणवत नव्हता. 

नववर्षाचे स्वागत करताना मल्याळी बांधव देवासमोर तसेच आरशासमोर फळे, भाजी, तांदूळ, दागिने, पैसे, लॅबनर्म (laburnum)फुले  ठेवतात, पण यावेळी यातील अनेक गोष्टी मिळतच नाही. पडवळ (snake gourd), पिवळी काकडी (yellow cucumber), फणस (jackfruit)आणि लॅबनर्म फुलांचा (laburnum flowers) या सणाला वापर करतात. या वस्तूंशिवाय विशू सण साजरा झालाच नाही, अशीच भावना असते. काही दिवसांपासून भाजीच मिळत नाही. तसेच देवासमोर केळी तसेच आंबेही ठेवावे लागते, मात्र यावर्षी काहीच मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली जात होती. 

मल्याळी भाषिकांचे वास्तव्य असलेल्या माटुंग्यातील अश्तिका समाजमध्ये दरवर्षी विशूचा उत्सव होतो, मात्र यावेळी फार गर्दी होणार नाही, असेच सांगितले जाते. विड्याची पाने, फुले कुठेतरी मिळत आहेत. माटुंग्यात वाशीतील एपीएमसीमधून भाजीपाला, फुले, फळे येतात. मात्र वाशी मार्केट बंद असल्याने माटुंग्यातील बाजार ओस पडला आहे. जी काही दुकाने उघडी आहेत, तेथेही भाव चढेच आहेत.

मल्याळी बांधवांनी सांगतात की,  `फळे आणि भाजीपाला किती महागला आहे. छोट्याशा कलिंगडसाठी शंभर रुपये मोजावे लागतात. अर्थात अनेकांनी यंदा हा उत्सव साजरा करताना पूजा करणार आहोत, पण गोडधोड काही नसेल. सद्यपरिस्थितीत अनेकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत असताना आम्हाला गोडधोड खावेसे कसे वाटेल. कोरोनाने सणाचा उत्साह कमी केला असला तरी सामाजिक बांधिलकी जास्त घट्ट करण्यास नक्कीच सुरुवात केली आहे.`

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com