Mumbra Kidnapping Case
ESakal
मुंबई
Crime: मी पण तिकडेच जातेय, मुलीला माझ्याकडे द्या...! असं म्हणाली अन्... बुरखाधारी महिलेनं ३ महिन्यांच्या चिमुकलीसोबत काय केलं?
Mumbra Crime News: मुंब्रा येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपासून अपहरणाच्या घटनेत वाढ होत असताना मुंब्र्यातही अशीच घटना घडली आहे.
ठाणे : मुंब्रा परिसरात रस्ता ओलांडताना एका अनोळखी बुरखा घातलेल्या महिलेने तीन महिन्यांच्या चिमुकलीस पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या बुरखाधारी महिलेविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

