
Railway Accident: ठाण्यातून रेल्वे अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. धावत्या ट्रेनमधून 10 प्रवासी रुळावर पडले असून यातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हे प्रवासी ट्रेनला लटकून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. दिवा ते कोपरस्थानका दरम्यान ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.