
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे : मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान सोमवारी (ता. ९) सकाळी रेल्वे लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले. यामध्ये याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली गेली, तसेच रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू असून अपघाताच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी रेल्वे प्रशासन व लोहमार्ग पोलिसांकडून दोन्ही रुळांतील अंतर मोजण्याचे काम सुरू होते.