
Mithi River
मुंबई : मिठी नदीच्या विकासाचे काम पावसाळ्यानंतर वेगाने सुरू होणार असून, नदीच्या विकासकामाबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेत अडकलेला हा टप्पा आता नव्या आराखड्यानुसार राबवला जाणार आहे.