पालिका कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! 'जुनी पेन्शन योजना' पुन्हा लागू होणार; पालिका आयुक्तांची भूमिका काय?
Pension Scheme: मुंबई महानगरपालिकेतील जुनी पेन्शन योजना लागू करण्यास महापालिका आयुक्त सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याचा २७०० कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील ५ मे २००८ पूर्वी भरती प्रक्रिया सुरू झालेल्या सुमारे २७०० कर्मचार्यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करण्यास महापालिका आयुक्त भूषण गगराणी सकारात्मक असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिली.